वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी इडब्ल्यूएस व ओबीसींना आरक्षण

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी इडब्ल्यूएस व ओबीसींना आरक्षण

  • केंद्र सरकारने २९ जुलै रोजी राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया कोट्यांतर्गत इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गांना (इडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पूर्वीचे धोरण :

 

१) अखिल भारतीय कोट्यांतर्गत एकूण जागांपैकी १५% पदवी आणि ५०% जागा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

२) २००७ पर्यंत वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षणाची तरतूद नव्हती.

३) ३१ जानेवारी २००७ रोजी अभय नाथ आणि दिल्ली विद्यापीठ व इतर या खटल्यांतर्गत सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींसाठी १५ टक्के अनुसूचित जमातींसाठी ७.५ टक्के आरक्षण देण्याचे सांगितले.

४) त्याचवर्षी सरकारने केंद्रीय शिक्षण संस्था (प्रवेशासाठी आरक्षण) कायदा, २००७ पारित केला, ज्याद्वारे ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्रीय शैक्षणिक संस्थांत २७ टक्के आरक्षण लागू झाले, मात्र अखिल भारतीय कोट्यातंर्गत त्याचा समावेश नव्हता.

५) तसेच १०३ वी घटनादुरुस्ती कायद्यान्वये (२०१९) केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले, त्यासाठी गेल्या दोन शैक्षणिक वर्षामध्ये वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त जागा वाढविण्यात आल्या.

६) मात्र ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गासाठीचे हे आरक्षण राज्य वैद्यकीय महाविद्यालयांच्या अखिल भारतीय कोट्यासाठी लागू नव्हते.

 

निर्णयामुळे होणारे बदल :

 

१) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून अखिल भारतीय कोट्यांतर्गत ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गासाठी वैद्यकीय तसेच दंतवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी आरक्षण देण्यात येईल.

२) लागू : एमबीबीएस, एमडी, डेंटल (बीडीएस), एमडीएस आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम

३) फायदे

अ) एमबीबीएस – १५०० ओबीसी, ५५० इडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना प्रवेश

ब) पदव्युत्तर : २५०० ओबीसी, १००० इडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना प्रवेश

 

अखिल भारतीय कोटा (AIQ)

 

  • स्थापना : १९८६
  • उद्देश : कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यास उत्तम वैद्यकीय महाविद्यालयात अधिवासमुक्त आणि गुणवत्तेवर आधारित प्रवेशाची संधी उपलब्ध करून देणे.

 

NEET (National Eligibility Entrance Test) :

 

  •  २००३ मध्ये पहिल्यांदाच आयोजन मात्र २००४ पासून बंद.
  • देशातील सर्व पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा.
  • २०१६ पर्यंत ऑल इंडिया प्री- मेडिकल टेस्ट (AIPMT) ही राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय महाविद्यालयांसाठीची प्रवेश परीक्षा.
  • १३ एप्रिल २०१६ सर्वोच्च न्यायालयाने इंडियन मेडिकल कौन्सिलच्या कलम १० (ड) चे समर्थन केले.
  • याअन्वये, NEET ही देशातील सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये घेतली जाणारी एकसमान प्रवेश परीक्षा आहे

Contact Us

    Enquire Now