वेणुगोपाल यांच्या कार्यकालात वाढ

वेणुगोपाल यांच्या कार्यकालात वाढ

  • देशाचे महान्यायवादी (Attorney General) के. के. वेणुगोपाल यांचा कार्यकाल एक वर्षाने वाढवून केंद्र सरकारने ३० जून २०२२ पर्यंत केला आहे.
  • ३० जून २०२१ ला त्यांचा कार्यकाल संपणार होता.

भारताचे महान्यायवादी

  • राज्यघटनेच्या अनुच्छेद ७६ नुसार राष्ट्रपती महान्यायवादींची नियुक्ती करतात.
  • तो देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी असून केंद्रीय कार्यकारी मंडळाचा (Executive Council) चा भाग असतो.
  • आपल्या पदावर महान्यायवादी राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार राहत असतो.

पात्रता :

  • सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे, म्हणजेच
  • भारतीय नागरिक असावा आणि
  • ५ वर्षे उच्च न्यायालयात न्यायाधीश राहिलेला असावा किंवा १० वर्षे उच्च न्यायालयात वकिली केलेली असावी किंवा
  • राष्ट्रपतींच्या मते तो ख्यातनाम कायदेतज्ज्ञ असावा (Eminent Jurist)

राजीनामा – राष्ट्रपतींकडे

कार्ये :

  • केंद्राचा मुख्य कायदा सल्लागार
  • राष्ट्रपतीने सोपवलेली कायदेशीर कार्ये पार पाडणे.
  • अनुच्छेद १४३ नुसार भारत शासनाचे सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिनिधित्व करणे.
  • भारत सरकारशी संबंधित सर्व खटल्यात सरकारची बाजू मांडणे.

अधिकार :

  • तो संसदेच्या कोणत्याही बैठकीत भाग घेऊ शकतो (परंतु मताधिकार नाही.)
  • तो शासनाचा पूर्णकालीन वकील नाही. त्याला खासगी वकिलीसुद्धा करता येते.
  • संसद सदस्यांना मिळणारे सर्व अधिकार त्याला मिळतात.
  • तो देशातील कोणत्याही कोर्टात उपस्थित राहू शकतो.
  • त्याच्या मदतीला सॉलिसिटर जनरल व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल असतात.
  • पहिले महान्यायवादी – एम. सी. सेटलवाड
  • वेणुगोपाल हे पंधरावे महान्यायवादी आहेत.

Contact Us

    Enquire Now