विधानसभा निवडणूक

विधानसभा निवडणूक

चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल

  • पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांत आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात माजी मुख्य निवडणुक आयुक्‍त सुनिल अरोरा यांनी २६ फेब्रुवारी २०२१ रोजी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली.
  • वरील सर्व विधानसभा निवडणुकांचा निकाल २ मे २०२१ रोजी जाहीर करण्यात आला.

अ) १५ वी आसाम विधानसभा निवडणूक, २०२१

  • कालावधी : २७ मार्च ते ६ एप्रिल २०२१
  • निवडणूक टप्पे : ३
  • नोंदणीकृत मतदार : २,३३,७४,०८७
  • एकूण मतदान : ८२.०४%

टप्पा

जागा

पहिला

४७

दुसरा

३९

तिसरा

४०

एकूण जागा : १२६ (बहुमत – ६४)

पक्षनिहाय जिंकलेल्या जागा :

पक्ष

जागा

टक्केवारी

भाजप

६० ३२

काँग्रेस

२९

२८.३

एजीपी

एआयडीएफ

१६

८.९

इतर १२

२२.८

  • सत्ताधारी भाजप महाआघाडी : ७५ जागा, यात भाजपा, आसाम गण परिषद, युपीपीएल समावेश होतो.
  • महाजोत – ५० जागा
  • अपक्ष – १ जागा
  • आसाममध्ये पहिल्यांदाच सलग दुसऱ्या वेळी बिगर – काँग्रेसी सरकार

सर्बानंद सोनोवाल :

  • जन्म – ३१ ऑक्टोबर १९६२
  • आसामचे १४ वे मुख्यमंत्री (२०१६ ते २०२१)
  • सोनोवाल हे चौदाव्या व सोळाव्या लोकसभेचे सदस्य होते.
  • माजी युवक कल्याण व क्रीडामंत्री
  • १९९२ ते १९९९ या कालावधीत ऑल इंडिया स्टुडंटस युनियन (आसू) या संघटनेचे अध्यक्ष

ब) १५ वी केरळ विधानसभा निवडणूक, २०२१

  • कालावधी : ६ एप्रिल 
  • निवडणूक टप्पे : १
  • एकूण जागा : १४० (बहुमत – ७५)
  • एकूण मतदान : ७४.५७%
  • पक्षनिहाय जिंकलेल्या जागा

पक्ष

जागा

मतांची टक्केवारी

भाकप

६२ २५.३८

काँग्रेस

२१

२५.१२

भाजप

११.३०

मुस्लिम लीग

१५

८.२७

इतर

२३.८

  • डाव्या आघाडीने १४० पैकी ७९ जागा जिंकल्या होत्या, तर २९ जागांवर निर्णायक आघाडी आणि काँग्रेसप्रणित संयुक्‍त लोकशाही आघाडीने (युडीएफ) ३६ जागा जिंकल्या असून ९ जागांवर आघाडी घेतली होती.
  • डाव्या आघाडीच्या सलग दुसऱ्या विजयामुळे कधी काँग्रेसप्रणित संयुक्‍त लोकशाही आघाडी (यूडीएफ), तर कधी एलडीएफ अशी सत्तांतराची गेल्या ४० वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.

पि. विजयन :

  • जन्म : २४ मे १९४५
  • विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश
  • १९९८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळ राज्य सरचिटणीस
  • २०१६ निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
  • आरोग्य यंत्रणांना सक्षम करून कोरोना साथीचे यशस्वी व्यवस्थापन, सामाजिक सुरक्षा वेतन योजनेतील निधीचे तत्पर वितरण

क) १६ वी तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१

  • कालावधी : ६ एप्रिल
  • निवडणूक टप्पे : १
  • एकूण जागा : २३४ (बहुमत – ११८)
  • एकूण मतदान : ७२.८१%
  • पक्षनिहाय जिंकलेल्या जागा :

पक्ष

जागा

टक्केवारी

द्रमुक

१३३

३७.३

आण्णा द्रमुक

६६

३३.५

भाजपा

२.८

इतर

३१

२६.४

  • द्रमुकचे करुणानिधी आणि अण्णाद्रमुकच्या जयललिता या नेत्यांच्या निधनानंतर झालेली महत्वपूर्ण निवडणूक.
  • अण्णाद्रमुकच्या पराभवामुळे तब्बल दहा वर्षांनंतर तमिळनाडूत सत्तापालट होऊन स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकची सत्ता
  • भाजपने अण्णा द्रमुक तर काँग्रेसने द्रमुकबरोबर आघाडी केली होती.
  • चित्रपट अभिनेते कमल हसन यांनी स्थापन केलेल्या मक्कल निधी मयम पक्षाचाही पराभव.

एम. के. स्टॅलिन :

  • जन्म : १ मार्च १९५३
  • ६८ वर्षीय स्टॅलिन यांनी उपमुख्यमंत्री, चेन्नईचे महापौरपद आणि करुणानिधी
  • सरकारमध्ये ग्रामविकास व स्थानिक प्रशासकीय खाती त्यांनी भूषविली होती.
  • व्यक्‍तीनिहाय तमिळनाडूचे १२ वे मुख्यमंत्री

ड) १७ वी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०२१

  • कालावधी : २७ मार्च ते २९ एप्रिल २०२१
  • निवडणूक टप्पे : ८
  • एकूण जागा : २९४ (बहुमत – १४८)
  • एकूण मतदान : ८१.८७%
  • पक्षनिहाय जिंकलेल्या जागा :
पक्ष जागा मतांची टक्केवारी
तृणमूल काँग्रेस २१३ ४७.९४
भाजप ७७ ३८.१३
भाकप (मार्क्सवादी) ४.७३
काँग्रेस २.९३
  • राज्यात विजय मिळवून ममता बॅनर्जीकडे सलग तिसऱ्यांदा राज्याची सत्ता आली आहे.
  • या निवडणुकांत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून डावे पक्ष आणि काँग्रेसच्याऐवजी भाजपने मुख्य भूमिका बजावली आहे.

ममता बॅनर्जी

  • जन्म : ५ जानेवारी १९५५
  • पक्ष : अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस
  • पश्चिम बंगालच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री
  • कन्याश्री, स्वास्थ्य साथी हेल्थ कार्ड आणि रुपश्री यांसारख्या कल्याणकारी योजना, बंगालची लेक म्हणून प्रचार, अल्पसंख्यांकांची मते या सर्व गोष्टींचा निवडणुकीत फायदा
  • १९९८ मध्ये तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना
  • पुस्तके : माय अनफरगटेबल मेमोरिज, स्ट्रगल फॉर एक्सिस्टन्स, स्लॉटर ऑफ डेमोक्रेसी

इ) १५ वी पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक, २०२१

  • कालावधी : ६ एप्रिल २०२१
  • निवडणूक टप्पे : १
  • एकूण जागा : ३० (बहुमत – १६)
  • एकूण मतदान : ८१.८८%
  • पक्षनिहाय जिंकलेल्या जागा :

पक्ष

जागा

मतांची टक्केवारी

रंगस्वामी काँग्रेस

१० २५.८५

भाजप

१३.६६

द्रमुक

१८.५१

काँग्रेस

१५.७१

  • माजी मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय एन. रंगास्वामी काँग्रेस पक्षाने पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणूकीत भाजपशी युती करून आघाडी घेतली आहे.

एन. रंगास्वामी 

  • जन्म : ४ ऑगस्ट १९५०
  • दुचाकीवरून फिरणारे किंवा लोकांना सहज उपलब्ध होणारे लोकांचे मुख्यमंत्री म्हणून ओळख.
  • २००१ ते २००८ या काळात काँग्रेस पक्षातून मुख्यमंत्री.
  • २००८ मध्ये मुख्यमंत्री पदावरून दूर केल्यामुळे स्वत:चा स्वतंत्र पक्ष एआयएनआरसीची स्थापना.
  • या पक्षातून २०११ ते २०१६ यांनी आता पुन्हा २०२१ मध्ये पुद्दुचेरीचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून निवड

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक

  • पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघात सलग तीन वेळा निवडून आलेल्या भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणूक घेण्यात आली.
  • या पोटनिवडणुकीत ५२४ मतदान केंद्रांवर सरासरी ६६.१५ टक्के मतदान झाले.
  • संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर शहर आणि याच तालुक्यातील २२ गावे मिळून हा मतदारसंघ बनतो.
  • या निवडणुकीचाही निकाल २ मे २०२१ या दिवशी जाहीर करण्यात आला.
  • महाविकास आघाडीचे भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके तर भाजपचे समाधान अवताडे यांत चुरशीची लढत
  • समाधान अवताडे यांच्या विजयाने भाजप चिन्हावरील उमेदवार येथून प्रथमच विजयी झाला आहे.

परिक्षाभिमुख माहिती :

  • राज्यघटनेच्या भाग ६, प्रकरण – ३ व कलम १६८ ते २१२ मध्ये राज्य विधीमंडळाबाबत तरतुदी नमूद केल्या आहेत.
  • देशात, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या सहा राज्यांत द्विगृही विधीमंडळ आहे.

विधानसभा :

  • राज्य विधीमंडळाचे कनिष्ठ सभागृह असून याचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.

सदस्यत्वासाठी पात्रता :

अ) ती व्यक्‍ती भारताचा नागरिक असावी.

ब) वयाची २५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.

क) त्याचे नाव राज्यातील कोणत्यातरी मतदार संघांच्या मतदार यादीत नमूद असावे

रचना :

  •  राज्याच्या लोकसंख्येनुसार कमीत कमी ६० व जास्तीत जास्त ५०० सभासद

अपवाद :

अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा ३०
मिझोरम ४०
नागालँड ४६
  • संसद व राज्य विधीमंडळाच्या निवडणुकांची जबाबदारी घटनेतील कलम ३२४ नुसार राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहे.
  • सुशील चंद्र हे भारताचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्‍त.

Contact Us

    Enquire Now