विधानसभाध्यक्ष निवडणूक लांबणीवर

विधानसभाध्यक्ष निवडणूक लांबणीवर

  • अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमात करण्यात आलेले बदल घटनेतील तरतुदीशी सुसंगत आहेत का ते तपासण्यासाठी राज्यपालांनी विधानसभाध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकण्यात आले आहे.
  • विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याऐवजी खुल्या किंवा आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला आहे.
  • राज्यात १९६०पासून अध्यक्ष निवडणुकीसाठी असलेल्या गुप्त मतदानाचा नियम महाविकास आघाडी सरकारने बदलून ही खुल्या किंवा आवाजी पद्धतीने घेण्याची तरतूद केली आहे.
  • विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षासाठी घटनेच्या १७८व्या कलमात तरतूद करण्यात आली आहे.
  • त्यात निवडून आलेले सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करतात. महाराष्ट्र विधानसभेने बदललेल्या नियमानुसार अध्यक्षाची आवाजी मतदानाने निवड, तर उपाध्यक्षांची नियुक्ती केली जाईल अशी दुरुस्ती करण्यात आली आहे. हा बदल घटनेशी सुसंगत नाही असा आरोप घेण्यात आला आहे.

१) विधानसभा संरचना – कलम १७०

सदस्य संख्या – किमान ६० कमाल – ५००

विधानसभेमध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकारानुसार थेट निवडून आलेले जनतेचे प्रतिनिधी.

क्र. १७२ – कार्यकाल – लोकसभेप्रमाणेच, विधानसभा कायमस्वरूपी ग्रह नाही.

कार्यकाल सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीपासून ५ वर्षे असतो. विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार राज्यपालास असतो.

क्र. – १७८ – विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष

  • विधानसभेतील सदस्यांपैकी एकाला विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडते.
  • अध्यक्षांची अधिकारपदाची मुदत विधानसभेच्या मुदतीइतकीच असते.
  • अध्यक्षाप्रमाणेच विधानसभेतील सदस्यांमधूनच उपाध्यक्षांची निवड केली जाते.
  • अध्यक्ष निवडणुकीची तारीख राज्यपालाद्वारे ठरविली जाते.
  • उपाध्यक्षाच्या निवडणुकीची तारीख विधानसभा अध्यक्षाद्वारे ठरविली जाते.

Contact Us

    Enquire Now