वस्त्यांची जातीवाचक नावे इतिहासजमा

वस्त्यांची जातीवाचक नावे इतिहासजमा – 

  • राज्यातील शहरे आणि  ग्रामीण भागांतील वस्त्यावस्त्यांच्या नावांमधून अस्तित्वात असलेली जातींची ओळख पुरून काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
  • त्यानुसार या वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यात येणार आहेत.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वस्त्यांची जातीवाचक नावे योग्य नसल्याचे मत व्यक्‍त केले होते.
  • त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने या वस्त्यांची नावे बदलण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला होता.
  • राज्यात अनेक ठिकाणी वस्त्यांची नावे महारवाडा, ब्राह्मणवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, माळी गल्ली अशा स्वरूपाची आहेत.
  • ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नसल्याने सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • त्यानुसार त्या वस्त्यांना आता समतानगर, भीमनगर, ज्योतीनगर, शाहूनगर, क्रांतीनगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येतील.
  • याआधी यासंबंधित झालेले बदल – दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करून त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास असे करण्यात आलेले आहे.
  • तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भूषण पुरस्कार असे करण्यात आले आहे.

Contact Us

    Enquire Now