लडाखला जम्मू-काश्मिर बँकेत ८.२३ टक्के हिस्सा मिळवण्यासाठी आरबीआयची मंजुरी

लडाखला जम्मू-काश्मिर बँकेत ८.२३ टक्के हिस्सा मिळवण्यासाठी आरबीआयची मंजुरी

  • भारतीय रिझर्व्ह बँकेने जम्मू-काश्मिर पुनर्गठन कायदा, २०१९ (३१ ऑक्टोबर, २०१९) लागू केल्याच्या तारखेनुसार जम्मू आणि काश्मिर बँक लिमिटेडच्या पेड-अप इक्विटी भांडवलाच्या ८.२३ टक्के अधिग्रहणास लडाख सरकारला मंजुरी दिली आहे.

पार्श्वभूमी:

  • जम्मू आणि काश्मिर बँक मंडळाने बँकेतील भागधारकांपैकी ८.२३ टक्के भाग म्हणजे सुमारे ४.५८ कोटी इक्विटी शेअर्सची मालकी लडाख सरकारला हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे.
  • हे बॅकिंग नियमन अधिनियम, १९४९ आरबीआयच्या मास्टर निर्देशांनुसार आहे –

अ) खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये शेअर्स किंवा मतदानाचे अधिकार संपादित करण्यासाठी पूर्व मंजुरी (निर्देश २०१५)

ब) खासगी क्षेत्रांतील बँकांमध्ये मालकी (निर्देश २०१६)

  • डिसेंबर २०२० पर्यंत जम्मू आणि काश्मिरचे सरकारचे बहुसंख्य भागधारक होते, त्यांच्याकडे ६८.१४ टक्के बँकेतील भागभांडवलाची मालकी होती.

Contact Us

    Enquire Now