राष्ट्रीय सागरी दिवस

राष्ट्रीय सागरी दिवस

  • भारतामध्ये दरवर्षी ५ एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिवस (National Maritime day) पाळला जातो.
  • ‘‘Sustainable Shipping beyond COVID-19’’ ही या दिनासाठीची २०२१ सालची थीम आहे.
  • यावर्षी भारताचे सागरी ध्येय-2030 याविषयी देखील चर्चा केली गेली.
  • आंतरमहाद्विपीय व्यापार आणि जागतिक अर्थव्यवस्थेला जगातील एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यात पोहोचण्यास उपयुक्त मार्ग अवलंबिणे तसेच वस्तूंच्या वाहतुकीसाठी अत्यंत सुरक्षित, संघटित आणि शांत मार्ग अनुसरणे ही उद्दिष्टे ठेवून हा दिवस साजरा करण्यात येतो.
    भारताच्या स्वत:च्या पहिल्या, वाफेवर चालणार्‍या ‘एस. एस. लॉयल्टी’ या जहाजाने ५ एप्रिल १९१९ रोजी मुंबईकडून ब्रिटनकडे प्रवासाला सुरुवात केली होती. या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस निवडण्यात आला.
  • पहिला राष्ट्रीय सागरी दिन १९६४ साली पाळण्यात आला होता.
  • जगभरात ८ जून हा दिवस जागतिक सागरी दिन म्हणून साजरा केला जातो.
  • भारताला तब्बल ७५१७ कि.मी.ची सागरी किनारपट्टी लाभली आहे. भारतातील १३ राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा सागराला जोडलेल्या आहेत.
  • भारतामध्ये एकूण १२ प्रमुख बंदरे आहेत शिवाय १८५ लहान बंदरे आहेत.

Contact Us

    Enquire Now