राष्ट्रीय माध्यान्ह आहार योजना (National Program for mid-day meal Scheme)

राष्ट्रीय माध्यान्ह आहार योजना (National Program for mid-day meal Scheme)

  • १५ ऑगस्ट १९९५ ला मध्यान्ह आहार योजना सुरू
  • शाळेतील पटनोंदणी वाढण्यासाठी, हजेरी वाढण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या पोषणस्तरात वाढ करण्यासाठी ही योजना
  • सर्वप्रथम १९२५  मद्रास महापालिकेने शाळांमधील मागास मुलांसाठी माध्यान्ह आहार कार्यक्रम सुरू केला होता.
  • १९९७-९८ ला ही योजना पूर्ण देशात लागू झाली. या अंतर्गत १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत पोषण आहार मिळत.
  • आहाराचा निकष प्रतिविद्यार्थी प्रतिदिन १०० ग्रॅम
  • १ एप्रिल २००८ पासून प्राथमिक सोबतच उच्च प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार मिळू लागला.
  • २०१३च्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याला अनुसरून सरकारने ३० सप्टेंबर २०१५ ला माध्यान्ह आहार नियम घोषित केले. 

नियम :

१) सुट्टी वगळता रोज शाळेतच, गरम, ताजे अन्न विद्यार्थ्यांना दिले पाहिजे.

२) शालेय व्यवस्थापन समितीने यावर देखरेख करावी.

३) शिजवलेल्या अन्नाची वेळोवेळी प्रमाणित शासकीय अन्न संशोधन प्रयोगशाळेत तपासणी करणे.

४) काही कारणांमुळे माध्यान्ह आहार देऊ न शकल्यास राज्यशासन अन्नसुरक्षा भत्ता देतील.

माध्यान्ह आहाराचे दैनिक प्रमाण

१ ली ते ५ वी ६ वी ते ८ वी
घटक वजन (gm) प्रथिने (gm) वजन (gm) प्रथिने (gm)
१) अन्नधान्य १०० gms ८ gm १५० gms १४ gm
२) डाळी २० gms ५ gm ३० gms ६.६ gm
३) भाज्या ५० gms ७५ gms
४) तेल ५ gms ७.५ gms

Contact Us

    Enquire Now