राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

  • देशभरात ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
  • ११ मे १९९८ रोजी माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानातील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-१ या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. या मिशनला ‘ऑपरेशन शक्ती’ असे नाव देण्यात आले होते. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, आर. चिदंबरम, डॉ. अनिल काकोडकर हे या चाचण्यांचे शिल्पकार होते.
  • या यशस्वी चाचणीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी भारताला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केले. २२ वर्षांपूर्वी भारताने केलेल्या या पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी १९९९ पासून राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो.
  • ११ मे हा दिवस इतिहासात १९९८ ची पोखरण अणुचाचणी आणि अंतराळातील भारताची मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. अणुबॉम्बची चाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता. भारताने ही अणुचाचणी गुप्तपणे केली होती.

Contact Us

    Enquire Now