राष्ट्रीय औषधोत्पादन शिक्षण व संशोधन संस्था सुधारणा विधेयक राज्यसभेत संमत

राष्ट्रीय औषधोत्पादन शिक्षण व संशोधन संस्था सुधारणा विधेयक राज्यसभेत संमत

  • नुकतेच राज्यसभेने राष्ट्रीय औषधोत्पादन शिक्षण व संशोधन संस्था (एनआयपीईआर) अधिनियम, १९९८मध्ये सुधारणा करणाऱ्या विधेयकाला पारित केले आहे.
  • १९९८च्या कायद्यांतर्गत पंजाबमधील मोहाली येथे राष्ट्रीय औषधोत्पादन शिक्षण आणि संशोधन संस्था स्थापन करण्यात येऊन तिला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित केले होते.
  • नवीन सुधारणा विधेयक अहमदाबाद, हाजीपुर, हैदराबाद, कोलकाता, गुवाहाटी आणि रायबरेली येथे असणाऱ्या सहा औषधोत्पादन शिक्षण आणि संशोधन संस्थांना राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून दर्जा देणार आहे.
  • शिवाय केंद्रस्तरावर एक सल्लागार परिषद स्थापन करण्याची तरतूद नवीन विधेयकात आहे.
  • हे विधेयक प्रत्येक एनआयपीईआरच्या नियामक मंडळाला सध्याच्या २३  सदस्यसंख्येवरून १२ बनवते आणि संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची व्याप्ती आणि संख्या वाढवते.
  • आयआयटीच्या धर्तीवर एनआयपीईआरचे व्यवस्थापन केले जाईल. एनआयपीईआर भारतासाठी अधिक पेटंट आणू शकतील अशा संशोधनात मदत करतील, ज्याचा परिणाम असा होईल की देश उच्च किमतीच्या औषधांची निर्मिती करू शकेल.

एनआयपीईआर (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च)

  • रसायने आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल विभागाच्या आधिपत्याखाली या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था आहेत. राष्ट्रीय महत्त्वाची कोणतीही संस्था ही एक स्वायत्त संस्था आहे ज्यामध्ये तिला परीक्षा घेण्याचे आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे/पदवी देण्याचे अधिकार असतात. तसेच त्यांना केंद्र सरकारकडून निधी मिळतो. केवळ देशातच नव्हे तर दक्षिणपूर्व आशिया, दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील देशांना औषधनिर्माण विज्ञान आणि संबंधित क्षेत्रांमध्ये नेतृत्व प्रदान करण्याची क्षमता या संस्थेत आहे. एनआयपीईआर, मोहाली हे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीजचे सदस्य आहेत.

Contact Us

    Enquire Now