रामानुजन पुरस्कार

रामानुजन पुरस्कार

  • भारतीय सांखिकी संस्थेच्या (ISI) प्राध्यापिका आणि गणितज्ज्ञ नीना गुप्ता यांना यावर्षीचा गणितातील श्रेष्ठ असा रामानुजन पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • नीना गुप्ता या कोलकाता येथे भारतीय सांख्यिकी संस्थेत गणिताच्या प्राध्यापिका आहेत. 
  • बीजगणितीय भूमिती आणि कम्युटेटिव्ह बीजगणितातील उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
  • रामानुजन पारितोषिक प्राप्त करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला आहेत. आतापर्यंत रामानुजन पुरस्कार चार भारतीयांना मिळाला आहे. त्यापैकी तीन भारतीय सांख्यिकी संस्थेचे प्राध्यापक आहेत.
  • बीजगणितीय भूमितीमधील मूलभूत समस्या, झारिस्की समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांना भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचा २०१४चा युवा वैज्ञानिक पुरस्कार मिळाला होता.
  • तसेच त्यांना याआधी २०१९ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कारदेखील मिळाला आहे.

रामानुजन पुरस्कार : 

  • सुरुवात : २००५
  • अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थ्योरेटिकल फिजिक्स, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने विकसनशील देशांमधल्या तरुण गणितज्ञांना हा पुरस्कार दिला जातो.

श्रीनिवास रामानुजन : 

  • जन्म : २२ डिसेंबर १८८७ (एरोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत)
  • प्रसिद्ध ब्रिटिश गणितज्ञ गॉडफ्रे हॅरॉल्ड हार्डी यांनी १९१३मध्ये त्यांची प्रतिभा ओळखली. गॉडफ्रे हॅरॉल्ड हार्डीच्या निमंत्रणावरून ते केंब्रिजला गेले.
  • रामानुजम यांनी संख्यांच्या विश्लेषणात्मक सिद्धांतामध्ये भरीव योगदान दिले आणि लंबवर्तुळाकार कार्यांवर काम केले.
  •  त्यांनी पूर्ण संख्येचे विभाजन, हायपरजिओमेट्रिक मालिका आणि यूलरच्या  स्थिरांकावर देखील काम केले.
  •  त्यांचे पेपर इंग्रजी आणि युरोपियन जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आणि १९१८ मध्ये ते लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये निवडले गेले.
  •  प्रदीर्घ आजारानंतर भारतात परतल्यानंतर २६ एप्रिल १९२० रोजी वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
  • श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ भारतात २२ डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला ोजातो

Contact Us

    Enquire Now