राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई

  • नुकतेच, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशातील झाशी रेल्वे स्टेशन हे ‘वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन’ म्हणून ओळखले जाईल अशी घोषणा केली आहे.

राणी लक्ष्मीबाई : 

  • पूर्ण नाव : लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
  • टोपणनाव : मनु (त्यांच्या लहानपणीचे नाव ‘मणिकर्णिका’ होते)
  • त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८३५ रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी नगरातील भैदानी नगर येथे झाला.
  • महाराष्ट्रातील पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला असणार्‍या मोरोपंत तांबे यांची ही मुलगी.
  • त्यांच्या आईचे नाव भागीरथीबाई. लक्ष्मीबाई ४ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले.
  • त्यामुळे वडिलांनीच त्यांचे संगोपन केले.
  • नानासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे या दुसर्‍या बाजीरावांच्या दत्तक मुलांबरोबरच मनु ब्रह्मावर्त येथे वाढली.
  • बाजीरावाने तिला स्वत:च्या मुलीसारखे वाढवून लिखाण-वाचनाबरोबरच मर्दानी शिक्षणही दिले. एवढेच नव्हे तर ब्रह्मावर्तामधल्या कार्यशाळेतून, आखाड्यांमधून राणीने अश्वपरीक्षा, घोडेस्वारी, तलवारबाजी, बंदूक चालविणे, पिस्तुले, जांबीया चालवणे यांचेही शिक्षण घेतले. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. 
  • राणी लक्ष्मीबाईंचा विवाह १८४२ मध्ये झाला. पेशव्यांच्या वाड्यात बागडणारी मनु झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांची पत्नी झाली.
  • त्यांना एक मुलगा दामोदर राव झाला, जो त्याच्या जन्माच्या चार महिन्यांतच मरण पावला.  बाळाच्या मृत्यूनंतर, तिच्या पतीने वासुदेवराव नेवाळकर या चुलत भावाच्या आनंदराव या मुलाला दत्तक घेतले, ज्याचे नाव महाराजांच्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर दामोदर राव असे ठेवण्यात आले.
  • १८५३मध्ये, जेव्हा झाशीच्या महाराजांचे निधन झाले तेव्हा लॉर्ड डलहौसीने दत्तक मुलाला मान्यता देण्यास नकार दिला आणि दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले.
  • झांशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले.
  • १८५७चा उठाव झाला तेव्हा ५ जून, १८५७ला झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या व तेथून राज्यकारभार चालवला.
  • दरम्यान २१ मार्च, १८५८ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.
  • १७ जूनला १८५८ ला लढाईत त्यांना वीरमरण आले.
  • नाव बदलण्याची प्रक्रिया : 
  •  राज्य विधानसभेने साध्या बहुमताने पारित केलेल्या कार्यकारी आदेशाने कोणत्याही गावाचे, शहराचे, किंवा स्टेशनचे नाव बदलता येते.तर राज्याचे नाव बदलण्यासाठी संसदेचे साधे बहुमत आवश्यक असते.
  •  रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग आणि भारतीय सर्वेक्षण यांच्याकडून कोणताही आक्षेप न आल्यास नामांतरासाठी केंद्रीय गृह मंत्रालय परवानगी देते.

Contact Us

    Enquire Now