राज्यातील 6 शिक्षणसंस्था जगातील गुणवत्तापूर्ण क्रमवारीत

राज्यातील 6 शिक्षणसंस्था जगातील गुणवत्तापूर्ण क्रमवारीत

  • सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021-22 ही क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये राज्यातील सहा शिक्षणसंस्थांचा समावेश आहे.
  • गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विविध निकषांवर मूल्यमापन करून जगभरातील या शिक्षणसंस्थांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
  • विशेष म्हणजे, मुंबईतील आयआयटी, आयटीसी, टीआयएफआर या संस्थांचा क्रमवारीत समावेश आहे.
  • सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021-22 च्या क्रमवारीत जागतिक पातळीवरील क्रमवारीत पहिल्या तीन क्रमांकांवर अनुक्रमे हार्वर्ड विद्यापीठ, मँसॅच्युलेट्‌स्‌ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ या संस्था आहेत.
  • देशातील 68 शिक्षणसंस्थांचा या यादीत समावेश आहे.
  • क्रमवारीतील शिक्षण संस्थांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांना मिळालेले रोजगार, संशोधनातील कामगिरी, प्राध्यापक या निकषांवर मूल्यमापन करण्यात येते.
  • देशातील शिक्षण संस्थांमध्ये आयआयएम अहमदाबाद या यादीत अव्वल स्थानी असून बंगळूरूचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स दुसऱ्या स्थानी, तर दिल्ली विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) चौथ्या स्थानी आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयसरचाही समावेश   

  • जागतिक पातळीवरील दोन हजार संस्थांमध्ये मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च 543 व्या स्थानी आहे.
  • त्यानंतर आयआयटी मुंबई (567), पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) 1024 व्या स्थानी तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 1389 व्या स्थानी आहे.
  • मुंबईतील होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट 1666व्या स्थानी असून मुंबईचीच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 1858व्या स्थानी आहे. 
  • राज्य शासनाच्या अखत्यारीतील राज्यांतील 13 अकृषी विद्यापीठांपैकी केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाच या क्रमवारीत स्थान मिळाले आहे.
  • एकाही खासगी विद्यापीठाला यात स्थान मिळाले नाही.

मुंबईत टीआयएफआर अव्वल 

  • मुंबईतील  शिक्षण संस्थांमध्ये टीआयएफआरने या क्रमवारीत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवले असून आयआयटी बॉम्बेने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.
  • त्यानंतर होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने स्थान मिळवले आहे.

Contact Us

    Enquire Now