रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा भारत दौरा

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा भारत दौरा

  • रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ६ डिसेंबर २०२१ रोजी भारत दौऱ्यावर आले. या दौऱ्यात पुतिन यांना भारतासोबत अनेक करार केले असून त्यामध्ये एस-४०० या प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेची भारताकडून खरेदी हा महत्त्वाचा करार आहे.
  • उभय देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांमधील पहिली २+२ बैठक महत्त्वाची आहे.

महत्त्वाचे

१) पहिली भारत रशिया २+२ संवाद – दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांदरम्यान पहिल्यांदाच २+२ संवाद बैठक घेण्यात आली. भारताने यापूर्वी क्वाड सदस्यांसोबत (यूएसए, जपान आणि ऑस्ट्रेलिया) २+२ स्वरूपाच्या बैठका घेतल्या आहे.

२) एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा – एस-४०० ही रशियाची सर्वात प्रगत लांब पल्ल्याची भूपृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे. चीन ही प्रणाली रशियाकडून घेणारा पहिला देश आहे.

  • मात्र अमेरिकेने CAATSA अर्थात काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरीज थ्रू सँन्क्शन्स या कायद्याद्वारे इराण, उत्तर कोरिया आणि रशियावर निर्बंध लादले आहेत.
  • त्यात रशियाच्या संरक्षण आणि गुप्तचर क्षेत्रासह महत्त्वपूर्ण व्यवहार करणाऱ्या देशांवरील निर्बंधाचा समावेश आहे.
  • अमेरिकेचा दबाव झुगारत भारताने या प्रणालीच्या संरक्षणाचा करार पूर्णत्वास नेला.

३) कलाश्निकोव (Kalashnikov) रायफल करार – अमेठी, उत्तरप्रदेश येथे ६ लाख AK-203 रायफल निर्मितीसाठी दोन करारांवर उभय देशांच्या स्वाक्षऱ्या झाल्या.

महत्त्वाचे

  • भारत सर्वाधिक शस्त्रस्त्र आयात रशियाकडून करतो.
  • दहशतवाद मुद्दा तसेच बहुपक्षीय मंचावर रशियाने भारताचे नेहमीच सहकार्य केले आहे.

Contact Us

    Enquire Now