म्यूकरमायकोसिस

म्यूकरमायकोसिस

संदर्भ

  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्यूकरमायकोसिस या गंभीर व दुर्मिळ बुरशीजन्य आजाराचा संसर्ग कोरोनामुक्त रुग्णांमध्ये वाढत आहे.
  • या जंतुसंसर्गाचा वेग कर्करोगाच्या गुणाकारापेक्षाही खूप जास्त आहे.

काय आहे म्यूकरमायकोसिस?

  • पर्यावरणामध्ये अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या म्यूकरमायसेट्‌स्‌ (mucormycetes) या कवकांच्या समूहापासून म्यूकरमायकोसिसची लागण होते.
  • विशेषतः हवा, माती, जनावरांचे रोग, कंपोस्ट इत्यादी बाबींमध्ये हे कवक आढळून येते.
  • म्यूकरमायकोसिसलाच झायगोमायकोसिस असेही म्हणतात.

म्यूकरमायसेट्‌स्‌

  • तापमान – सहनशील (Thermotolerant) कवकांचा समूह
  • यांतील म्यूकोरल्स ऑर्डरमधील बुरशीमुळे म्यूकरमायकोसिस होतो.
  • सामान्यपणे, रायझोपस आणि म्यूकर या प्रजातींपासून होणाऱ्या म्यूकरमायकोसिसचे प्रमाण अधिक आहे.
  • पर्यावरणात हे म्यूकरमायसेटस्‌ हवेपेक्षा मातीमध्ये व हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त प्रमाणात आढळतात.
  • ही बुरशी (कवक) बहुतेक लोकांसाठी हानिकारक नसून कमी रोगप्रतिकारक व्यक्ती असलेल्या व्यक्तींसाठी प्राणघातक ठरू शकते.
  • बुरशीजन्य बीजाणू (spores) श्वसनाद्वारे शरीरात प्रवेश करतात. श्वासोच्छ्वासास अडथळा निर्माण करतात.
  • एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर हा जंतुसंसर्ग रक्तवाहिन्या आणि उतींवर गुणाकार करण्यास प्रारंभ करतो.

संसर्ग

  • श्वासोच्छ्वास, रोगप्रतिबंधक लस टोचण्याद्वारे किंवा वातावरणातील म्यूकरमायसेटस्‌च्या बीजाणूंमुळे या आजाराचा संसर्ग होतो.
  • माणसाकडून माणसाला किंवा माणसाकडून प्राण्यांना याचा संसर्ग होत नाही.
  • या बुरशीचा संसर्ग नाक, घसा, जबडा, दात यांपासून सुरू होऊन डोळे व मेंदूपर्यंत पोहोचून दृष्टीवर विपरित परिणाम होऊ शकतो. 
  • शिवाय काही वेळा जीवासही धोका निर्माण होऊ शकतो.

म्यूकरमायकोसिसचे प्रकार

  • शरीराच्या कोणत्या भागावर प्रादुर्भाव होतो त्यानुसार म्यूकरमायकोसिसचे पाच प्रकार आहेत.
क्र. प्रकार प्रभावित अवयव लक्षणे धोका
1 ऱ्हायनोसेरेब्रल म्यूकरमायकोसिस (Rhinocerebral Mucormycosis) सायनस आणि मेंदू डोकेदुखी, गाल दुखणे किंवा सुजणे, काळपट अथवा तपकिरी रंगाचा स्राव नाकातून येणे, ताप येणे अनियंत्रित मधुमेह व मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेले रुग्ण
2 पलमनरी म्यूकरमायकोसिस (Pulmonary Mucormycosis) फुप्फुस ताप येणे, खोकला, छातीत दुखणे,श्वसनास त्रास होऊन धाप लागणे कर्करोग, अवयव प्रत्यारोपण किंवा स्टेम सेल्सचे प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती
3 गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्यूकरमायकोसिस (Gastrontestinal Mucormycosis) आतडे पोटदुखी, मळमळ आणि उलटी प्रौढांपेक्षा लहान मुलांमध्ये प्रमाण अधिक 

विशेषतः पूर्णतः वाढ न झालेले किंवा वजनाने कमी असलेले एक महिन्याच्या आतील बाळ

4 क्यूटॅनियस म्यूकरमायकोसिस (Cutaneous Mucormycosis) त्वचा अल्सर, सूज येणे, नेक्रोसिस, खवले असलेली त्वचा शस्त्रक्रियेनंतर झालेल्या त्वचेवरील भेगा, भाजलेली त्वचा, जखम, खराब झालेले ड्रेसिंग्ज
5 प्रसारित म्यूकरमायकोसिस (Disseminated Mucormycosis) रक्तप्रवाहाद्वारे प्लीहा, हृदय तसेच त्वचेवर विपरित परिणाम संसर्ग झालेल्या अवयवावर सूज, रक्ताची उलटी HIV

लक्षणे

  1. डोकेदुखी
  2. डोळेदुखी
  3. डोळे बाहेर आल्यासारखे दिसू लागते
  4. गाल दुखणे
  5. दृष्टी अधू होणे
  6. दोन-दोन प्रतिमा दिसतात (डबल व्हिजन)
  7. तोंडाचा अल्सर
  8. नाकातून काळा रक्तस्राव
  9. टाळूवर काळ्या रंगाची निर्मिती
  10. दात किंवा हिरड्यांमधून पस येणे

अधिक धोका

  1. कमी रोगप्रतिकारक शक्ती
  2. अनियंत्रित मधुमेह
  3. एचआयव्ही
  4. लोह ओव्हरलोड सिंड्रोम
  5. कर्करोगबाधित रुग्ण
  6. ज्येष्ठ नागरिक
  7. कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णालयात हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी घेतली असल्यास

प्रतिबंध 

  • म्यूकरमायकोसिसचे बुरशीजन्य बीजाणू हवेतून आणि ओलसर वातावरणातून पसरतात. त्यामुळे लगेचच चक्रीवादळ किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर नुकसान झालेल्या इमारती किंवा पूरग्रस्तांशी थेट संपर्क टाळणे.
  • कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या रुग्णांनी बाहेर जाताना मास्कचा वापर करावा.
  • बाहेर जाताना लांब बाहीचे कपडे आणि ग्लोव्ह्ज्‌ घाला, कारण हे बीजाणू त्वचेवरील कट किंवा बर्नद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात.
  • लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे.

निदान व चाचणी

  • म्यूकरमायकोसिसचा संसर्ग झाल्याची साशंकता असल्यास, नाकातून द्रवपदार्थाचा नमुना किंवा ऊतक बायोप्सीद्वारे निदान करता येते.
  • ऊतक बायोप्सीमध्ये (Tissue Biopsy) संसर्ग झालेल्या ऊतींचे फंगल कल्चर किंवा सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले जाते.
  • तज्ज्ञ दंतचिकित्सक आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी तयार केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून म्युकरमायकोसिसची लक्षणे अगदी सुरुवातीच्या अवस्थेत शोधता येतात.

उपचार

  • Amphotericin B, Posaconazole, Isavuconazole म्यूकरमायकोसाईट्‌स्‌वर अधिक प्रभावी ठरते. 
  • इंट्राव्हेनस (IV) ॲण्टिफंगल औषधे किंवा सर्जिकल डिब्राइडमेंट (संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित ऊती कापून टाकणे).
  • अँटीफंगल थेरपी – 4 ते 6 आठवडे

डेंटलदोस्त

  • 25 दंतचिकित्सकांची सलग 7 दिवस 24 तास विनामूल्य दंतरोगाचे निदान करणारी भारतातील पहिली टीम.
  • 7797555777 या क्रमांकावर संपर्क साधून किंवा डेंटलदोस्त या ॲण्ड्रॉइड ॲपवर दात स्कॅन करून रोगाचे निदान विनामूल्य व घरी बसून केले जाऊ शकते.

म्यूकरमायकोसिस आणि कोविड 19

  • कोरोना प्रतिबंधक उपचारादरम्यान म्यूकरमायकोसिसची लागण झालेली प्ररकणे अहमदाबाद, मुंबई तसेच दिल्ली या ठिकाणी आढळून आले.
  • कोरोना उपचारातील स्टिरॉईड्स सह अन्य औषधांच्या अधिक सेवनामुळे बुरशीचा प्रादुर्भाव अधिक होऊन रोगाची लागण
  • कोरोना काळातील म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगामुळे दगावणाऱ्या लोकांचा दर 30 टक्के इतका आहे.
  • या आजारातील औषध महागडे असल्याने म्यूकरमायकोसिस रुग्णांवर महाराष्ट्रात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येणार आहेत.    

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

  • महाराष्ट्र सरकारने 1 ऑक्टोबर 2016 रोजी सूरू झालेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या धर्तीवर नवीन उपचारांचा समावेश असलेली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महात्मा फुले यांच्या 125 व्या पुण्यतिथीनिमित्त 1 एप्रिल 2017 पासून सुरू करण्यात आली.

उद्देश

  • गरिबांना महागड्या आरोग्य सुविधा पुरविणे.

लाभार्थी

  • दारिद्र्य रेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना , अन्नपूर्णा योजना शिधापत्रिकाधारक व दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेली) कुटुंबे (शासकीय, निमशासकीय कर्मचारी व आयकरदाते वगळून).
  • शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी,  महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक तसेच अधिस्वीकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब व अन्य लाभार्थी.

खर्च मर्यादा:

  • योजनेंतर्गत समाविष्ट उपचार पद्धतीवरील  उपचारांसाठी कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा सरंक्षण रक्कम प्रतिवर्ष प्रती कुटुंब रु. २.००  लाख एवढी आहे.
  • मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सदर मर्यादा प्रती वर्ष / प्रती कुटुंब रु. ३.०० लाख असेल.  यामध्ये दात्याचा (donor) समावेश आहे.
  • त्यात 1034 प्रकारची ऑपरेशन्स केली जातील, यामध्ये प्लास्टिक सर्जरी, हृदयविकार, मोतिबिंदू आणि कर्करोग सारखे ऑपरेशन्स तसेच गुडघा हिप इम्प्लांट, डेंग्यू, स्वाइन फ्लू, पेडियाट्रिक सर्जरी, सिकल सेल अॅनिमियासारख्या आणखी काही ऑपरेशन्सचा समावेश होतो.

Contact Us

    Enquire Now