म्यानमारमध्ये कवी खेट थी यांचा मृत्यू

म्यानमारमध्ये कवी खेट थी  यांचा मृत्यू

  • लष्करी उठावाला विरोध करणारे म्यानमारमधील लोकप्रिय कवी खेट थी यांचा अटकेदरम्यान मृत्यू झाला.
  • ते 45 वर्षांचे होते.
  • खेट थी पेशाने अभियंता होते, ते एक कवीही होते. काव्यनिर्मितीवर लक्ष केंद्रीत करता यावे म्हणून 2012 ला अभियंताची नोकरी सोडली. उदरनिर्वाहासाठी आईस्क्रिम व केक बनवत असत.
  • खेट थी लष्करी उठावाला विरोध करत. ते म्हणत, लष्करी उठाव डोक्यात गोळी घालतात, पण कृती हृदयातून होते. हे त्यांना माहित नाही. अशा त्यांच्या ओळी आंदोलकांना प्रेरणादायी ठरल्या.
  • सागैंग प्रांतातील श्वेबो हे गाव उठावाच्या केंद्रस्थानी होते.
  • खेट थी आणि त्यांच्या पत्नी यांना सशस्त्र दल सैनिकांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. खेट यांच्या पत्नी चॉ सू यांनी दोघांची चौकशी झाली असल्याचे बीबीसी बर्मीज वृत्तसंस्थेला मोनिबा येथून सांगितले.
  • खेट यांना चौकशी ठाण्यावर ठेवण्यात आले आहे. पण ते आले नाहीत, त्यांचे पार्थिव आले असे खेट थी यांच्या पत्नीने सांगितले.
  • खेट यांना हृदयविकाराचा त्रास होतो, असे सांगून त्यांना मृत्यूपत्र देण्यात आले व त्यांना वाचवण्याची तसदी सुद्धा घेतली नाही, असे चॉ सू यांनी सांगितले.
  • 1 फेब्रुवारीमध्ये लष्कराने उठाव केल्याने अनेक दिग्गज आणि नामवंत व्यक्तींनी विरोध दर्शविला आहे. 
  • खेट थी म्हणाले होते की, मी अवघा एक मिनिट जगलो तरी माझी सदसद्‌विवेकबुद्धी त्या मिनिटभर कालावधीत शाबूत असली पाहिजे. 
  • या लष्करी उठावात शेकडो व्यक्ती मारल्या जात असून हजारे व्यक्तींची धरपकड केली जात आहे.
  • असिस्टन्स असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिझनर्स या कार्यकर्त्यांच्या संघटनेचे एक वृत्त जारी केले.
  • त्यानुसार खेट यांचा चौकशी ठाण्यात छळ झाल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे हुतात्म्यांचा आकडा 780 झाला आहे.

Contact Us

    Enquire Now