मुंबई-पुण्यात टाटा समूहाने आणलेल्या क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने कोरोना चाचणी होणार

मुंबई-पुण्यात टाटा समूहाने आणलेल्या क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने कोरोना चाचणी होणार

  1. राज्यात वाढत्या करोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता टाटा समूहाने तपासणीसाठी नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. CRISPR-Cas (Clustered Regularly Interspaced Short Palindromic Repeats-Cas) असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. त्यामुळे रुग्णांचा स्वॅब जास्त अचूकतेने व गतीने मिळणार आहे.
  2. यासाठी NABL आणि ICMR ने लॅबला मान्यता दिली आहे.
  3. सद्यस्थितीत मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणी या तंत्रज्ञानाद्वारे चाचणी केली जात आहे. पुण्यात सुरू होणाऱ्या लॅबचे हे तंत्रज्ञान टाटा समूहाच्या सहाय्याने झाले आहे.
  4. त्यामुळे क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानातील सामंजस्य करारातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करणारी ही भारतातील पहिली लॅब ठरली आहे. 
  5. या तंत्रज्ञानाने होणारी तपासणी सध्या होणाऱ्या अँटिजेन व RTPCR चाचणीपेक्षा अचूक राहणार आहे. त्यामुळे आता कोरोना निदानाची अचूकता अनेक पटीने वाढणार आहे.
  6. यामध्ये स्वॅब घेतल्यापासून दोन ते तीन तासांत रिपोर्ट येतो. त्यामुळे 24 तासांत एका लॅबमध्ये 500 ते 2000 तपासण्या केल्या जाऊ शकतात.
  7. या संदर्भात स्वॅब घेणाऱ्यांकडे मोबाईलवर एक ॲप्लिकेशन तयार करून दिले आहे. त्यामध्ये माहिती भरल्यानंतर (त्या व्यक्तीची) ज्यावेळी रिपाेर्ट तयार होतो, तेव्हा तो रुग्णाच्या मेलवर किंवा मोबाईलवर आणि ICMR च्या पोर्टलवर एकाच वेळी जातो. त्यामुळे वेळेची बचत होते. शिवाय या चाचणीमुळे / तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यूके, साऊथ आफ्रिकन, ब्राझिलियन व्हेरियंट देखील सहजपणे तपासता येणार आहेत.
  8. तसेच RTPCR तपासणी करताना रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे शोधण्यासाठी जो स्कोअर देण्यात येतो तसाच ताे येथेही देण्यात आला आहे.
  9. जर तो स्कोअर 10 पेक्षा कमी आला तर तो रुग्ण निगेटिव्ह असेल. जर 10-20 च्या मध्ये आला तर तो काठावर पॉझिटिव्ह असेल आणि 20 च्या वर आला तर तो पूर्णपणे पॉझिटिव्ह असेल, असा अर्थ या चाचणीतून निघेल, अशी माहिती लॅब व्यवस्थापक मनाली ससाणे यांनी दिली. 
  10. क्रिस्पर कॅस चाचणीसंबंधी लवकरच मोबाईल लॅबसुद्धा सुरू केली जाणार आहे.

Contact Us

    Enquire Now