मारुती चितमपल्ली यांना सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मारुती चितमपल्ली यांना सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

  • अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर.

योगदान :

  • डॉ. चितमपल्ली यांनी निसर्ग, पक्षी, वन आणि साहित्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मारुती चितमपल्ली

  • जन्म : ५ नोव्हेंबर १९३२ (सोलापूर)
  • कार्यक्षेत्र – वन्यजीवात्म्यास लेखन
  • वनधिकारी म्हणून ३६ वर्षे नोकरी
  • नोकरीदरम्यान व नोकरीनंतर ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणीजीवन आणि त्यांचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करतात.
  • रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वतीने प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण असा एक प्रमाणपत्र अभ्याक्रम चालविला जातो.
  • चितमपल्ली यांनी ८४व्या वर्षी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला व तो अभ्यासक्रमही पूर्ण केला.

मारुती चितमपल्ली यांना मिळालेले पुरस्कार :

  • भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार
  • नागपूरच्या सिटिझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार २००८
  • महाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागाकडून दिलेला विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार २०१७
  • १२ व्या किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार – २०१८
  • पुण्याची ॲडव्हेंचर फाउंडेशन ही संस्था २००६ पासून निसर्ग संशोधनाचे किंवा संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तीला “मारुती चितममपल्ली” यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते.

चितमपल्ली यांनी लिहिलेली पुस्तके

  • २००२ : आनंददायी बगळे, केशरचा पाऊस
  • १९९५ : घरट्यापलीकडे, चकवाचांदण : एक वनोपनिषद (आत्मचरित्र)
  • २००४ : चैत्रपालवी
  • १९८५ : जंगलाचं देणं (१९८९चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त), नवेगावबांधचे दिवस
  • २००२ : निळावंती
  • १९९३ : रातवा (१९९४ चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त)
  • १९९१ : रानवाटा (१९९२ चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त)
  • २००० : सुवर्णगरूड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार

  • कला, संस्कृती, साहित्य, शास्र, क्रीडा व संशोधन, सामाजिक, राजकीय, कृषी, उद्योग व व्यापार आदी क्षेत्रापैकी एखाद्या क्षेत्रामध्ये जीवनभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस दिला जातो.
  • स्वरूप : रोख रक्कम रु. ५१०००/ सन्मानपत्र व गौरवचिन्ह

Contact Us

    Enquire Now