महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन/मराठी रंगभूमी दिन

महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन/मराठी रंगभूमी दिन 

  • सुरुवात : १९४३पासून
  • १९४३मध्ये सांगली येथे मराठी नाटकाचा शतसांवत्सरिक उत्सव व नाट्यसंमेलन भरले. त्यावेळी सांगलीचे तत्कालीन संस्थानिक श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी ‘नाट्य विद्यामंदिर’ स्थापन करण्यासाठी गावातील मध्यवर्ती जागा दिली व तेथील इमारतीचा कोनशिला समारंभ ५ नोव्हेंबर रोजी झाला. या संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर हे होते. 
  • नाट्य महोत्सवातील हा महत्त्वाचा दिवस, दरवर्षी नटराजपूजन करून ‘रंगभूमी दिन’ म्हणून पाळला जातो.
  • काही ठिकाणी असे म्हटले जाते की, ५ नोव्हेंबर १८४३ मध्ये विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ या मराठी पहिल्या नाटकाचा प्रयोग केला होता. परंतु, भावे यांनी त्या वर्षी हा प्रयोग कधी केला याची तारीख अजूनही संशोधकांना उपलब्ध नाही.
  • विष्णुदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला.
  • या दिनी सांगलीची ‘अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती’ १९६० सालापासून विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करणार्‍या ज्येष्ठ कलाकाराला ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ देऊन त्यांचा सन्मान करते.

Contact Us

    Enquire Now