मलेरिया मोहिमेसाठी भारतीय वंशाचे डॉक्टर जागतिक समन्वयक

मलेरिया मोहिमेसाठी भारतीय वंशाचे डॉक्टर जागतिक समन्वयक

  • अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनाने डॉ. राज पंजाबी यांची नेमणूक मलेरिया नियंत्रण मोहिमेचे समन्वयक म्हणून केली असून ते भारतीय वंशाचे आहेत.
  • आफ्रिका व आशियाई देशांतून मलेरियाचे उच्चाटन करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.
  • डॉ. राज पंजाबी हे पेशाने डॉक्टर असून सार्वजनिक आरोग्य व्यावसायिक आहेत.
  • मलेरिया निर्मूलनाच्या ध्येयात ते ‘युनायटेड स्टेट्‌स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ व ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’ या संस्थांच्या वतीने समन्वयाचे काम करतील.
  • मलेरिया निर्मूलन मोहिमेची सुरुवात २००५ मध्ये झाली त्यात २४ देश सहभागी असून आग्नेय आशिया व ग्रेटर मेकाँग, आफ्रिका या भागात मलेरिया आटोक्यात आणण्याचे उद्दिष्ट त्यात आहे.

हिवताप (मलेरिया)

  • उष्णकटिबंधीय प्रदेशांतील प्रोटोझोआ या एककोशिकीय सूक्ष्मजीवांमुळे होणारा आणि डासांकडून पसरविला जाणारा हिवताप हा एक महत्त्वाचा रोग आहे.
  • ॲनोफिलिस डासाची मादी चावल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
  • परजीवी रोगाविरुद्ध जगातील पहिली लस – मॉस्किरिक्स किंवा (RTS,S)
  • जागतिक मलेरिया दिन – २५ एप्रिल

अलिकडील संबंधित

  • २०३० सालापर्यंत भारतातून मलेरियाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) २५ एप्रिल २०१९ रोजी जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने ‘मेरा इंडिया’ उपक्रम सुरू केला.
  • MERA India = Malaria Elimination Research Alliance India
  • मलेरिया निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या भागीदारांचा हा एक सामूहिक गट आहे.
  • उद्देश – २०३० पर्यंत भारतातून मलेरिया निर्मूलन करण्यासाठी आणि लोकसंख्येला असणारा मलेरियाचा धोका कमी करण्यासाठी समन्वयित संशोधनाला प्राधान्य देणे.

Contact Us

    Enquire Now