मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत सरकारकडून डीबीटीद्वारे आर्थिक मदत

मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत सरकारकडून डीबीटीद्वारे आर्थिक मदत

  • मध्यान्ह भोजन योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून थेट लाभ हस्तांतरणाच्या (Direct Benefit Transfer DBT) आर्थिक मदत मिळणार आहे.
  • या योजनेचा लाभ 11 कोटी ८० लाख विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे मध्यान्ह भोजन योजनेला उत्तेजन मिळेल.
  • केंद्र सरकारच्या “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने”अंतर्गत सुमारे ८० कोटी लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला प्रती व्यक्ती ५ किलो धान्याचे मोफत वितरण करण्याच्या योजनेच्या व्यतिरिक्त ही विशेष योजना आहे.
  • या योजनेमुळे मुलांच्या पोषण पातळीचे संरक्षण होईल व महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीत प्रतिकारशक्ती सुरक्षित राखण्यास पाठबळ मिळेल.
  • केंद्र सरकार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना १२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देणार आहे.
  • देशातील ११ लाख २० हजार सरकारी तसेच अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या ११ कोटी ८० लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

Contact Us

    Enquire Now