भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधानांचा सत्कार

भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधानांचा सत्कार

  • अलिकडेच, भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ (यालाच “गाडाग पेल गी खोर्लो” म्हणूनही ओळखले जाते) प्रदान केला गेला.
  •  भूतानच्या ११४व्या राष्ट्रीय दिवसाच्या निमित्ताने ही घोषणा करण्यात आली.
  • भूतानच्या सर्वोच्च शासकास ‘ड्रुक ग्याल्पो’ असे म्हणतात.
  • ऑर्डर ऑफ द ‘ड्रुक ग्याल्पो’ची ७ नोव्हेंबर २००८ रोजी स्थापना झाली, ज्यांनी भूतानच्या राष्ट्र आणि लोकांसाठी आयुष्यभर सेवा केली त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

पंतप्रधानांना बहाल इतर पुरस्कार:

  • ऑर्डर ऑफ अब्दुलाझीझ अल सौद (२०१६) : सौदी अरेबियाचा सर्वोच्च सन्मान. गैर-मुस्लिम मान्यवरांना दिला जातो.
  •  गाझी अमीर अमानुल्ला खान राज्यादेश (२०१६) : अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान.
  •  ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार (२०१८) : पॅलेस्टाईनचा सर्वोच्च सन्मान.
  •  ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार (२०१९) : संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च नागरी सन्मान.
  •  ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्कार (२०१९) : रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान
  •  ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ निशान इज्जुद्दीन (२०१९) : मालदीव.
  •  किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसाँ (२०१९) : बहारीन.
  •  लीजन ऑफ मेरिट (२०२०) : उत्कृष्ट सेवा आणि कार्ये यांच्या कामगिरीमध्ये असाधारणपणे गुणवंत वर्तनासाठी युनायटेड स्टेट्स सशस्त्र दलाद्वारे दिला जातो.
  •  सेऊल शांतता पुरस्कार (२०१८) : दक्षिण कोरिया
  •  चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड (२०१८) : संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान
  •  ग्लोबल गोलकीपर पुरस्कार : स्वच्छ भारत अभियान (२०१९) साठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे

Contact Us

    Enquire Now