भारतीय रिझर्व्ह बँकेचा द्विमासिक पतधोरण आढावा

भारतीय रिझर्व्ह बँकेचा द्विमासिक पतधोरण आढावा

  • आरबीआयचे गव्हर्नर डॉ. शक्तिकांत दास यांनी मुंबईत २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला.
  • भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह पतधोरण आढावा समितीने रेपो दरात काहीही बदल नसून तो ४.१ इतका तर, रिव्हर्स रेपो दर ३.३५% इतका कायम ठेवण्यात आला आहे.
  • बँक रेट आणि अल्प स्थायी सुविधा दर (मार्जिनल स्टॅडिंग फॅसिलिटी) ४.२५ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे.
  • २०२१-२२ या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ९.५% इतका असेल असे अंदाज व्यक्त केले आहे. तर २०२१-२२ वर्षात चलनफुगवट्याचा दर -५.१% असेल.

अतिरिक्त उपाययोजना – अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी

  • हॉटेल्स, रेस्टॉरंट, सहल आयोजक, पर्यटन एजंट्‌स, हवाई वाहतुकीशी संबंधित सहायक सेवा, अशा काही संपर्क संबंधित क्षेत्रांना उभारी देण्यासाठी १५००० कोटी रुपयाची तरलता मदत जाहीर केली आहे.
  • त्याशिवाय खासगी बसचालक, कारचालक, इव्हेंट आयोजित करणारे लोक, , स्पा, क्लिनिक्स, सलून आणि ब्युटी पार्लर्स अशा सर्वांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळणार आहे.
  • एमएसएमई क्षेत्राच्या पतविषयक गरजांची पूर्तता करण्यासाठी व पत पत -अभावयुक्त आणि अविकसित आकांक्षी जिल्ह्यातील लघुउद्योगांना उभारी देण्यासाठी सिडबीला अभिनव मॉडेल्सच्या माध्यमातून १६००० कोटी रुपये कर्ज देण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
  • एमएसएमई क्षेत्रातील कमाल सरासरी एक्स्पोझर क्षमता २५ कोटी रुपयांवरून ५० कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाईल.

सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा अनुमानित दर

  • आर्थिक वर्ष – २०२१-२२ -९.५%
  • पहिल्या तिमाहीत – १८.५%
  • दुसऱ्या तिमाहीत – ७.९%
  • तिसऱ्या तिमाहीत – ७.२%
  • चौथ्या तिमाहीत – ६.६%
  • २८ मे २०२१ पर्यंत देशाचा परकीय चलन साठा ५९८.२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. आता $६०० अब्ज परकीय चलन साठ्यापासून दूर आहोत अशी घोषणा शक्तिकांत दास यांनी केली.

Contact Us

    Enquire Now