भारतातील वृद्धांच्या मदतीसाठी ‘सेज’ उपक्रमाचा आणि ‘सेज’ पोर्टलचा प्रारंभ

भारतातील वृद्धांच्या मदतीसाठी ‘सेज’ उपक्रमाचा आणि ‘सेज’ पोर्टलचा प्रारंभ

  • भारतातील वृद्धांच्या मदतीसंदर्भात ‘सेज’ (SAGE – सिनियरकेअर एजिंग ग्रोथ इंजिन) उपक्रमाचा आणि ‘सेज’ पोर्टलचा शुभारंभ केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला.
  • यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि श्री. रतनलाल कटारिया उपस्थित होते. विभागाचे सचिव श्री. आर. सुब्रह्मण्यम यांनी यावेळी प्रस्तावित केले.
  • वेगाने वाढणाऱ्या वृद्ध लोकसंख्येच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने, सहकार्य आणि विश्वसनीय स्टार्ट-अपद्वारे वृद्धांची काळजी घेणारी उत्पादने आणि सेवांची एकाच ठिकाणी उपलब्धता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी ‘सेज पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे.
  • ५ जून, २०२१ पासून या पोर्टलचे कार्यान्वयन सुरू झाले असून सेजचा भाग होण्यासाठी समर्पित पोर्टलच्या माध्यमातून स्टार्ट-अप्स अर्ज करू शकतात.
  • तांत्रिक उपलब्धता प्रदान करण्यास सक्षम असणाऱ्या स्टार्ट-अप्सची निवड नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांच्या आधारे केली जाईल. गृहनिर्माण, आरोग्य, देखभाल केंद्र, वित्त, अन्न आणि संपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांशी हे संबंधित असतील.
  • वाढती वृद्धसंख्या लक्षात घेवून वृद्धांनी आनंदी, निरोगी आणि आर्थिक तसेच शारिरीकदृष्ट्या सक्रिय राहावे, यासाठी २०१६ मध्ये एक ‘जेष्ठ नागरिक कल्याण निधी’ सुरू करण्यात आला होता.
  • जेष्ठ नागरिकांशी संबंधित सेवा कार्यक्रमांना पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने ‘सिनियरकेअर एजिंग ग्रोथ इंजिन’ पोर्टल (सेज) सुरू करण्यात आले आहे. तसेच वृद्धांना सेवा देण्याच्या क्षेत्रातील उद्योगांमध्ये उत्सुक असणाऱ्या लोकांना ‘सेज’ उपक्रमाचा आणि ‘सेज’ पोर्टलचा प्रारंभ करण्यात आला असल्याचे मंत्री गहलोत यांनी सांगितले.
  • शिक्षण मंत्रालयाच्या ‘नीट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चंद्रशेखर बुद्ध आणि सहाय्यक नवोन्मेष संचालक डॉ. एलेंगोवान यांनी विक्रमी वेळेत हे ‘सेज’ पोर्टल तयार केले आणि त्याला अंतिम स्वरूप दिले.

Contact Us

    Enquire Now