भारताचे सॉलिसिटर जनरल

भारताचे सॉलिसिटर जनरल

  • नुकतेच अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना त्यांच्या पदावरून दूर करावे अशी मागणी केली.
  • पश्चिम बंगालचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना तुषार मेहता दिल्लीत भेटले होते असे या खासदारांचे म्हणणे आहे.
  • सुवेंदू अधिकारी हे नारद खटला आणि शारदा घोटाळ्यातील आरोपी आहेत. म्हणून देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च कायदा अधिकाऱ्याने आमदाराची अशी भेट घेऊन चर्चा करणे औचित्याचे नाही असा आरोप तृणमूलच्या खासदारांचा आहे.
  • तुषार मेहता हे या  खटल्यांमध्ये सर्वोच्च आणि कलकाता उच्च न्यायालयात  सीबीआयचे प्रतिनिधित्व करत आहेत. 
  • सीबीआय तृणमूलच्या नेत्यांची चौकशी या खटल्यांच्या संदर्भात करत आहे.
  • सॉलिसिटर जनरल, ज्यांची सीबीआयसाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाते आणि त्याच एजन्सीमार्फत चौकशी केली जात असलेल्या आरोपी व्यक्तीशी भेट घेणे कितपत योग्य आहे यावर  या खासदारांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

सॉलिसिटर जनरल :

  • सॉलिसिटर जनरल हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च कायदा अधिकारी  असतो.
  • तो ॲटर्नी जनरलला दुय्यम असून त्याच्या अधीनस्थ काम करतो
  • कायदेशीर बाबींमध्ये तो सरकारला सल्ला देत असतो.
  • सॉलिसिटर जनरलची नियुक्ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीद्वारे (Appointments Committee) तीन वर्षांसाठी केली जाते.
  • त्याच्या मदतीसाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नियुक्त केले जातात.
  • पहिले सॉलिसिटर जनरल : सी. के. दफ्तरी

Contact Us

    Enquire Now