बी. बी. एफ (रुंद वरंबा सरी) लागवड तंत्रज्ञान

बी. बी. एफ (रुंद वरंबा सरी) लागवड तंत्रज्ञान

  • हे तंत्रज्ञान पर्जन्य आधारित शेतीस वरदान आहे.
  • सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस, मका व हरभरा पिकास उपयुक्त
  • निविष्ठा खर्चात (बियाणे, खते इ.) २० ते २५ टक्के बचत तर उत्पन्नामध्ये २५ ते 30 टक्के वाढ
  • बी. बी. एक पेरणी यंत्राच्या साहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्याने मूलस्थानी जलसंधारण साधले जाऊन जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध
  • पर्जन्यमान खंडाच्या कालावधीत पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते तर जास्त पर्जन्यमान झाल्यास अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते.
  • आधुनिक शेती करण्यास मदत होते. तसेच जमिनीची सच्छिद्रता वाढून जमीन भुसभुशीत होते.

समृद्ध शेती :

  • भारतातील एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोक ग्रामीण भागात राहतात आणि त्यांचा मूळ व्यवसाय शेती आहे.
  • देशाचे दुसरे प्रधानमंत्री लालबहाद्दूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान हा नारा दिला होता.
  • गेल्या काही दशकांमध्ये राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या उपजीविकेसाठी या क्षेत्रावर अवलंबून आहे. राज्याचे सरासरी पर्जन्यमान १०७५ मिलिमीटर एवढे आहे. राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७ लाख हेक्टर आहे. त्यापैकी निव्वळ पेरणी क्षेत्र १६८ लाख हेक्टर आहे. राज्यात खरीपाचे क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर आहे. तर ५१.२० लाख हेक्टर क्षेत्र रब्बी पिकाखाली आहे.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘विकेल ते पिकेल’ अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीअंतर्गत ९७०२ ठिकाणी विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. राज्यात ‘अर्ज एक योजना अनेक’ याप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवरून कृषी विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. राज्यात ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत. राज्यातील २४ उत्पादनांना भौगोलिक चिन्हांकन व मानांकन प्राप्त झाले आहे.
  • राज्यात कापूस पिकाखालील क्षेत्र ४२.८६ लाख हेक्टर असून ९८ टक्के क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड होते. यंदा खरीपाचे क्षेत्र वाढणार असून अपेक्षित क्षेत्र १५७ लाख हेक्टर आहे.

भौगोलिक मानांकन प्राप्त पिके

क्रमांक पिके/फळे उत्पादन क्षेत्र/जिल्हा
१) केसर आंबा औरंगाबाद
२) केळी जळगाव
३) देशी तूर नवापूर (नंदूरबार)
४) द्राक्ष नाशिक
५) कांदा लासलगाव
६) वांगी जळगाव
७) चिकू पालघर
८) अंजीर सासवड (पुणे)
९) हापूस आंबा रत्नागिरी, सिंधुदुर्ग
१०) आंबेमोहोर तांदूळ मुळशी (पुणे)
  • राज्यात प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात आली असून त्या माध्यमातून गावांच्या कृषी विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने प्रथमच ग्रामस्तरावर कृषी विस्तार आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याची दखल घेऊन केंद्र शासनाने महाराष्ट्राला प्रथम तीन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
  • शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने कापूस पिकासाठी ‘एक गाव एक वाण’ मोहीम राबवण्यात येणार आहे.

Contact Us

    Enquire Now