बसवराज बोम्मई : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

बसवराज बोम्मई : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

  • कर्नाटकचे २३वे मुख्यमंत्री म्हणून बोम्मई यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
  • कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी बसवराज बोम्मई यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली.
  • माजी मुख्यमंत्री दिवंगत एस. आर. बोम्मई यांचे ते पुत्र आहेत.
  • कर्नाटकात एच. डी. देवगौडा आणि एच. डी. कुमारस्वामी यांच्यानंतर पिता-पुत्र जोडीने मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची ही दुसरी वेळ आहे.
  • बी. एस. येदियुरप्पा यांच्या जागी त्यांच्याच मंत्रिमंडळातील गृहमंत्री आणि सरकारमधील क्रमांक दोनचे मंत्री बोम्मई हे मुख्यमंत्री झाले.

कारकीर्द :

अ) शिक्षण : मेकॅनिकल इंजिनीअरिंग

ब) राजकीय कारकीर्द :

१) १९९८ आणि २००४ : धारवाड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून कर्नाटक विधानपरिषद सदस्य म्हणून दोनवेळा निवड

२) २००८ : जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश

३) २००८ ते २०१३ : हावेरी जिल्ह्यातील शिगाव मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेवर निवड यादरम्यान मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा, सदानंद गौडा, जगदीश शेट्‌टर यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री म्हणून काम

४) २०१९ : सहकारमंत्री, गृहमंत्री

५) २१ जानेवारी २०२१ ते २६ जुलै २०२१ : कायदा आणि न्यायमंत्री, संसदीय कामकाजमंत्री

क) मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यावर पहिल्याच दिवशी घेतलेले निर्णय:

    • उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची घोषणा
    • राज्यातील विधवा, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या निवृत्तीवेतनात वाढ

घटनात्मक तरतूद :

कलम १६४ (१) मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार केली जाईल.
कलम १६४ (२) मंत्रिमंडळ सामूहिकरीत्या विधानसभेला जबाबदार असेल.
कलम १६४ (३) मंत्र्यांची पद व गोपनीयतेची शपथ
कलम १६४ (४) मंत्री सलग ६ महिन्यांत विधिमंडळ सदस्य न झाल्यास अपात्र
कलम १६४ (५) विधिमंडळ कायद्यानुसार मंत्र्यांचे वेतन व भत्ते

Contact Us

    Enquire Now