फ्रेंच खुल्या स्पर्धेत त्सित्सिपासवर मात करत जोकोव्हिचची जेतेपदाला गवसणी

फ्रेंच खुल्या स्पर्धेत त्सित्सिपासवर मात करत जोकोव्हिचची जेतेपदाला गवसणी

  • अग्रमानांकित खेळाडू नोवोक जोकोव्हिचने पहिले दोन सेट गमावल्यानंतरही विजयश्री कशी खेचून आणायची हे दाखवले आहे. नोवोक जोकोव्हिचने पाच सेटमध्ये ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफॅनोस त्सित्सिपासचा पराभव करून फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.
  • जोकोव्हिच सध्या क्रमवारीत अग्रस्थानी आहे. या सामन्यात जोकोव्हिचने त्सित्सिपासला ६-७ (६/८), २-६, ६-३, ६-२, ६-४ ने पराभूत केले. हे त्यांचे दुसरे फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विजेतेपद आहे. तसेच त्याच्या कारकिर्दीतले हे एकोणविसावे ग्रँड स्लॅम आहे.
  • जोकोव्हिच सर्वाधिक २० ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यापेक्षा एका ग्रँडस्लॅम जेतेपदाने मागे आहे. जगातील सर्वोत्तम टेनिसपटूपैकी एक असलेला राफेल नदाल याआधी नंबर वन खेळाडू रॉजर फेडररचा विक्रम मोडण्याच्या उद्देशाने मैदानात आला होता. फेडरर आणि नदाल या दोघांनी आतापर्यंत २०-२० ग्रँड-स्लॅम जिंकले आहेत. फेडररला हरविण्यासाठी आत नदालला पुढच्या फ्रेंच खुल्या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे.
  • संपूर्ण कारकिर्दीत चारही ग्रँड स्लॅम जेतेपद किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पटकावणारा नोव्होक जोकोव्हीच हा खुल्या पर्वातील पहिला टेनिसपटू ठरला आहे.
  • फ्रेंच स्पर्धेची दोन, अमेरिकन स्पर्धेची तीन, विम्बलंडनची पाच आणि आॅस्ट्रेलियन स्पर्धेची नऊ जेतेपदं जोकोव्हिच च्या नावे झाली आहेत.
  • फ्रेंच खुल्या स्पर्धेत म्हणजे लाल मातीवर आपली सत्ता गाजवत त्याने हा विक्रम केला आणि जेतेपद आपल्या नावावर केले. तिसऱ्या सेटनंतर त्सित्सिपासला पाठीचे दुखणे सुरू झाले होते. मात्र त्याने मैदान सोडले नाही. या युवा खेळाडूने जिंकण्याची आशा शेवटपर्यंत सोडली नाही. तो प्रयत्न करत राहिला. चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिच त्याच्यावर भारी पडला. दोन सेटमध्ये विजय मिळवल्यानंतर त्याला हा विजय टिकवण्यात यश आले नाही. मात्र या युवा खेळाडूचेही सर्वत्र कौतुक होत आहे. जोकोव्हिचचे हे या मोसमातील दुसरे ग्रँड स्लॅम ठरले.
  • महान टेनिसपटू ब्योन बोर्ग यांच्या हस्ते जोकोव्हिचला विजेतेपदाचा करंडक देऊन गौरविण्यात आले.

फ्रेंच खुल्या स्पर्धेबद्दल थोडक्यात :

  • स्थापना – १८९१
  • ठिकाण – पॅरिस, फ्रान्स
  • कोर्ट पृष्ठभाग – क्ले/आउटडोअर
  • फ्रेंच खुल्या स्पर्धा ही फ्रान्सच्या पॅरिस शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे.
  • जगातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्लँड स्लॅम स्पर्धेपैकी एक
  • दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा पॅरिसचा स्ताद रोलौ गारो क्रीडासंकुलात दरवर्षी मे व जून महिन्यादरम्यान भरवली जाते.
  • १९२८ सालापासून फ्रेंच खुल्या स्पर्धा ह्याच ठिकाणी खेळवल्या जातात. लाल मातीवरच्या कोर्टवर खेळली जाणारी ही एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे.

Contact Us

    Enquire Now