फ्रान्सकडून ४० मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा

फ्रान्सकडून ४० मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा

  • ‘समुद्रसेतू २’ मोहिमेअंतर्गत नौदलाच्या ‘आयएनएस त्रिकंड’ या जहाजावरून ४० मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू मुंबई बंदरात दाखल झाला.
  • कतारच्या हमाद बंदरावरून भारतीय नौदलाच्या त्रिकंड जहाजाने द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूने भरलेले क्रायोजेनिक कंटेनर्स वाहून आणले.
  • फ्रान्सकडून ‘ऑक्सिजन सॉलिडॅरिटी ब्रिज’ या मोहिमेंतर्गत भारताला प्राणवायूची मदत करण्यात आली आहे.
  • कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने उपचारांकरिता देशात वैद्यकीय प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे.
  • प्राणवायूची गरज लक्षात घेऊन जगभरातून भारताला मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
  • फ्रान्सने कतारमार्गे द्रवरूप प्राणवायूची पहिली खेप भारताला पाठविली आहे.
  • भारतीय नौदलाचे त्रिकंड हे जहाज ५ मे रोजी कतारमधील हमाद बंदरात पोहोचले होते.
  • आयएनएस त्रिकंड जहाजावरून आलेला प्राणवायूचा साठा राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला.
  • दरम्यान, भारताचे कतारमधील राजदूत डॉ. दीपक मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या भारत फ्रान्स उपक्रमाद्वारे, येत्या दोन महिन्यांत फ्रान्सकडून आणखी ६०० मेट्रिक टनाहून अधिक प्राणवायू भारताला पुरविला जाणार आहे.

Contact Us

    Enquire Now