पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना – कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी

पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना – कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी

  • कोविड १९मुळे पालक किंवा पालनपोषण करणारे किंवा कायदेशीर पालक/दत्तक पालक गमावलेल्या मुलांना ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ (PM Care For Children) योजनेंतर्गत मदत करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.
  • कोविडबाधित मुलांना आधार मिळविण्यासाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी योजना सुरू
  • या योजनेंतर्गत मुलांना

१) मुलांच्या नावे मुदत ठेव

  • मुलगा किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यावर त्या प्रत्येकासाठी दहा लाख रुपयांचा निधी मिळेल. निधी उभारण्यासाठी केलेल्या योजनेत पीएम केअर्सचे महत्त्वाचे योगदान असेल.
  • त्याची किंवा तिची वैयक्तिक आवश्यकतेसाठी उच्च शिक्षणाच्या कालावधीत १८ वर्षांपासून पुढील पाच वर्षासाठी हा निधी मासिक आर्थिक पाठिंबा/छात्रवृत्ती देण्यासाठी वापरला जाईल.
  • २३व्या वर्षात पदार्पण केल्यावर वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी एक रकमी निधीची रक्कम मिळेल.

२) शालेय शिक्षण – १२-१८ वर्षांच्या मुलासाठी

  • मुलाला सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय इ. केंद्र शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश मिळेल.
  • जर मुले पालक, आजी-आजोबा, वाढीव कुटुंबाच्या देखरेखीखाली असेल तर, केंद्रीय विद्यालयात किंवा खासगी शाळेत डे स्क्रॉलर म्हणून प्रवेश मिळेल.
  • खासगी शाळेत प्रवेश मिळाल्यास आरटीईच्या निकषांनुसार फी पीएम केअरमार्फत देण्यात येईल, तसेच गणवेश, पाठ्यपुस्तके यांचा खर्चही पीएम केअर मधून.

३) उच्च शिक्षणासाठी मदत

  • देशातील व्यावसायिक अभ्यासक्रम/उच्च शिक्षणासाठी कर्ज मिळविण्यासाठी मदत केली जाईल. त्यावरील व्याज पीएम केअरद्वारे भरले जाईल.
  • केंद्र किंवा राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्र नसलेल्या मुलांसाठी पंतप्रधान केअर्स मधून सममूल्य शिष्यवृत्ती दिली जाईल.

४) आरोग्य विमा

  • ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यात येईल.
  • या मुलांची प्रिमिअम रक्कम १८ वर्षे वयापर्यंत पीएम केअरद्वारे देण्यात येईल.

Contact Us

    Enquire Now