पाकिस्तान आणि चीन यांच्यात आझादपट्टण जलविद्युत प्रकल्पाचा करार

पाकिस्तान आणि चीन यांच्यात आझादपट्टण जलविद्युत प्रकल्पाचा करार

  • ७ जुलै २०२० रोजी पाकिस्तान आणि चीनच्या गेझोबा ग्रुप कंपनी लिमिटेडने पाकव्याप्त काश्मीरच्या सुध्नोती जिल्ह्यातील झेलम नदीवर आझादपट्टण जलविद्युत प्रकल्पासाठी (७०० मेगावॅट) अभियंता खरेदी व करार (Engineer Procurement and Contract) यावर स्वाक्षरी करण्यात आली.
  • आझादपट्टण प्रकल्प झेलम नदीवर याच जलविद्युत योजनांपैकी एक आहे.
  • १.५ अब्ज डॉलर्सचा हा प्रकल्प चीन-पाकिस्तान आर्थिक हमरस्ता (CPEC) अंतर्गत दुसरा विद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम २००२ मध्ये प्रस्तावित करण्यात आले होते.
  • बूट (BOOT-Build, Own, Operate, Transfer) मॉडेलवर विकसित केलेला हा प्रकल्प २०२४ पर्यंत चालू होईल आणि ३० वर्षांनंतर पाकिस्तान सरकारकडे देण्यात येईल.
  • याआधी २ जून २०२० रोजी मुजफ्फराबादजवळील झेलम नदीवरील २.३ अब्ज डॉलर्स किंमतीच्या कोहळा प्रकल्पासाठी (११०० मेगावॅट) करार झाला आहे.
  • पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशात धरणे व इतर पायाभूत सुविधांच्या बांधकामाबाबत भारताने निषेध केला आहे.

चीन पाकिस्तान आर्थिक हमरस्ता (CPEC – China-Pakistan Economic Corridor) 

  • CPEC ची स्थापना २२ मे २०१३ रोजी झाली आहे.
  • सध्याचे चेअरमन लेफ्टनंट जनरल असीम सलीम बाजवा आहेत.
  • CPEC हा वन बेल्ट वन रोड (OBOR) चा एक भाग आहे. ज्याचा उद्देश पायाभूत सुविधा विकसित करणे आणि सुधारणे हा आहे.
  • कोहला, आझादपट्टण व करोट हे प्रकल्प चीन-पाकिस्तान आर्थिक हमरस्ता (CPEC) अंतर्गत विकसित केले गेले आहेत.
  • वन बेल्ट वन रोड (OBOR – One Belt One Road) हा उपक्रम चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफचे परराष्ट्र धोरण व आर्थिक रणनीती आहे.
  • सध्या OBOR मध्ये ७८ देश सहभागी असून एकूण ७९० प्रकल्प या अंतर्गत कार्यरत आहेत.

Contact Us

    Enquire Now