पश्चिम घाटात 8 नवी संरक्षित वने

पश्चिम घाटात 8 नवी संरक्षित वने

  • राज्यातील पर्यावरण संवर्धनासाठी वनांची जोपासना करण्याच्या दृष्टीने संवेदनशील अशा पश्चिम घाटातील 8 तर विदर्भातील 2 अशा 10 नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
  • याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव हे राज्यातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे.
  • त्याचे एकूण क्षेत्र 269 चौरस किलोमीटर आहे.
  • आधीचे सहा आणि नवीन घोषित झालेले तिलारी असे मिळून राज्यात सध्या 7 संवर्धन राखीव क्षेत्रे आहेत.
  • त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 5, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1, सातारा जिल्ह्यातील 2 तर विदर्भातील 2 अशा आणखी 10 नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांची भर पडली आहे.

या आधीचे निर्णय –

  • या बैठकीच्या आधीच्या संवर्धन क्षेत्रांत महत्त्वाची कामे करण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी द्यावा या वन विभागाच्या मागणीवर प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
  • वनमंत्री संजय राठोड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची या बैठकीस उपस्थिती होती.

 सूचना काय?

  • वाघाप्रमाणे बिबट्या आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
  • अवनी वाघिणीच्या पिल्लाची संपूर्ण वाढ झाली असेन या पिल्लाला पेंच येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यास मान्यता.
  • नवीन डान्झिट ट्रीटमेंट सेंटर सुरू करण्यासाठी नाशिक पुणे येथून प्रस्ताव प्राप्त, जुन्या डान्झिट सेंटरला निधी देऊन सक्षम करण्याचा निर्णय.
  • चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी नियुक्‍त समितीचा अहवाल लवकरच शासनास सादर होईल.
  • चांदा ते बांदापर्यंत जे महाराष्ट्राचे वनवैभव आहे. त्याचे विविध ऋतूतील वैशिष्ट्य टिपण्यास वन रक्षकांना सांगावे, त्याचा दर्जा उत्तम राखावा यावरून राज्यासाठी आपण एक चांगली फिल्म तयार करू.
  • महेंद्रीला संवर्धन राखीव घोषित करताना भविष्यात त्याचे अभयारण्यात रूपांतर करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घेऊन, गावकऱ्यांशी चर्चा करून पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना.

नवी भर-

  1. आंबोली दोडा मार्ग संवर्धन राखीव क्षेत्र (सिंधुदुर्ग)
  2. चंदगड संवर्धन राखीव क्षेत्र (कोल्हापूर)
  3. आजरा-भुदरगड संवर्धन राखीव क्षेत्र (कोल्हापूर)
  4. गगनबावडा संवर्धन राखीव क्षेत्र (कोल्हापूर)
  5. पन्हाळगड संवर्धन राखीव क्षेत्र (कोल्हापूर)
  6. विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्र (कोल्हापूर)
  7. जोर जांभळी संवर्धन राखीव क्षेत्र (सातारा)
  8. मायणी संवर्धन राखीव क्षेत्र (सातारा)
  9. महेंद्री संवर्धन राखीव क्षेत्र (अमरावती)
  10. मुनिया संवर्धन राखीव क्षेत्र (अमरावती)

Contact Us

    Enquire Now