पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन

पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन

  • हे मिशन प्रथम टप्प्यात अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या सहा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या जिल्ह्यांमध्ये एकूण ५०० उत्पादक गट स्थापित करावयाचे आहेत.
  • उद्देश : जैविक किंवा सेंद्रीय शेतीचा प्रचार व प्रसार करताना शेतकरी समूहगट स्थापित करून स्वनिर्मित निविष्ठांचा उपयोग करून उत्पादित शेतमालाचे सेंद्रीय प्रमाणीकरण प्राथमिक प्रक्रिया, बाजारपेठ शृंखला इत्यादीतून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून तीन वर्षांत उत्पन्नात वाढ करणे.
  • स्वरूप : ५० एकर क्षेत्राचे क्लस्टर तयार करून समूह संकलन केंद्र स्थापन करण्यात येईल. हे केंद्र गटासाठी मार्गदर्शन केंद्र व उत्पादित मालाचे खरेदी-विक्री केंद्र म्हणून काम करेल. या केंद्रावर शेतमालाची प्राथमिक प्रक्रिया व साठवणूक करण्यात येईल. ५० क्लस्टरचा जैविक महासंघ तयार करण्यात येईल. मिशनमधील जैविक सेंद्रीय प्रमाणित मालासाठी एकच ब्रँड तयार करण्यात येत आहे.

Contact Us

    Enquire Now