निहंग शीख

निहंग शीख

संदर्भ 

  • मागील वर्षी कोविड लॉकडाऊन दरम्यान ‘मूव्हमेंट पास’ दाखवण्यास सांगितल्यानंतर, निहंगांच्या एका गटाने पटियालामध्ये एका पोलिसाचा हात तलवारीने कापला होता.
  • तर नुकतेच नवी दिल्लीतील सिंघू सीमेजवळ त्यांनी एका तरूणाची पवित्र शास्राचा अपमान केला या कारणावरून हत्या केली.
  • घटनेच्या दिवशी त्याने गुरू ग्रंथसाहिबची तोडफोड केली होती. ज्यामुळे त्यास पकडण्यात आले होते.

निहंग कोण आहेत?

  • निळे वस्र, तलवार, भाले यासारखे शस्र बाळगणारे आणि स्टीलच्या कोटांनी सजलेली पगडी परिधान करणारे शीख.
  • निहंगाच्या स्थापनेचे श्रेय शिखांचे दहावे गुरू ‘गुरू गोविंदसिंह’ यांना जाते.
  • एका सरावादरम्यान त्यांचा मुलगा फतेह सिंग (१६९९-१७०५) निळा पोशाख आणि हातात तलवार घेऊन लढायला उतरला असता गोविंदसिंहांनी खालसा सैनिकांचा पोशाख असा असावा असे म्हटले.
  • तेव्हापासून निहंग शीख निळे कपडे परिधान करतात.
  • ईस्ट इंडिया कंपनीचे कर्नल जेम्स स्किनर यांच्या लेखानुसार खालसा शीखांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.

अ) निहंग शीख (निळा निशाण साहीब; खालसा संहितेचे कडक पालन)

ब) इतर शीख (केशरी निशाण साहीब)

शीखांच्या इतिहासातील निहंगांची भूमिका

१) पहिल्या शीख राजवटीच्या पतनानंतर (१७१०-१५), जेव्हा मुघल आणि अफगाण शासक अहमद शाह दुर्रानी शिखांना मारत होते, तेव्हा शिखांना वाचविण्यासाठी निहंगांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

२) निहंगांनी अमृतसरमधील अकाल बंगा (अकाल तख्त) येथे शीखांच्या धार्मिक बाबींवरही नियंत्रण घेतले.

३) १८४९ मध्ये शीख साम्राज्याच्या पतनानंतर १८५९ मध्ये जेव्हा पंजाबच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुवर्ण मंदिराच्या प्रशासनासाठी व्यवस्थापक (सरब्रह) नेमला; तेव्हा निहंगाचा प्रभाव संपला.

Contact Us

    Enquire Now