नासाची शुक्र मोहीम

नासाची शुक्र मोहीम

  • अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA) शुक्रासाठी (Venus) नवीन मोहीम आखत आहे.
  • १९९० नंतर शुक्रावरील नासाची ही पहिलीच मोहीम असेल.
  • शुक्रावरील तापमान आणि फॉस्फिन घटक जे जीवनाच्या उपस्थितीतच शक्य आहेत, अंदाज वैज्ञानिकांनी वर्तविल्यामुळे शुक्र पुन्हा एकदा जगाच्या नजरेत आला आहे.

शुक्रावर पाठविण्यासाठी अमेरिकेचे दोन मिशन :

अ) दा व्हिन्ची प्लस (Da Vinci +)

ब) व्हेरिटास (Veritas)

अ) दा व्हिन्ची प्लस : (दाविन्सी + शुकाच्या वातावरणातील राजवायू, रसायनशास्त्र आणि इमेजिंगची तपासणी)

  • शुक्र ग्रहावर फॉस्फिनच्या अस्तित्वाची खात्री करणे हे दा व्हिन्चीचे उद्दिष्ट आहे.
  • त्याअंतर्गत अंतराळयानाद्वारे एक उपकरण या ग्रहावर पाठवले जाईल जे तेथील वातावरणात असलेल्या घटकांचा आणि वायूचा शोध घेईल.

ब) व्हेरिटास :

  • हे रडार आणि स्पेक्ट्रोमीटरच्या सहाय्याने ग्रहाचा त्रिमितीय भौगोलिक नकाशा तयार करेल आणि पृष्ठभागाच्या रचनेचा अभ्यास करेल.
  • ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचे देखील मूल्यांकन करेल जेणेकरून गर्भात असलेल्या गोष्टींचा अंदाज घेतला जाऊ शकेल.

शुक्र ग्रह :

  • सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह त्याच्या पृष्ठाचे तापमान शिसे (Lead) वितळण्याइतके उच्च म्हणजेच ५० अंश सेल्सियस इतके आहे.
  • सौरमालेतील केवळ शुक्र व युरेनस ही दोन ग्रह स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात.
  • पृथ्वी शुक्राच्या कक्षेच्या सर्वात जवळ आहे. तसेच दोन्हींचा आकार, वस्तुमान व रचना जवळजवळ समान आहेत, म्हणून शुक्राला पृथ्वीचा जुळा ग्रह संबोधतात.
  • शुक्राचे वातावरण दाट कार्बनडायऑक्साईडचे बनले आहे.
  • शुक्राला स्वत:च्या आसाभोवती फिरण्यास लागणारा कालावधी : २४३ दिवस
  • सूर्याभोवती फिरण्यास लागणारा कालावधी : २२४ दिवस

शुक्रावरील ऐतिहासिक मोहिम

वर्ष मोहीम देश
१९९४ मॅगेलन अमेरिका
२००५ व्हीनस एक्सप्रेस युरोप
२०१० अकात्झुकी जपान

शुक्रावरील भविष्यातील मोहिमा

  • युरोपियन स्पेस एजन्सी (इसा) यिसस (Theseus) आणि स्पिका (Spica) या दोन खगोलशास्रीय प्रस्तावाबरोबर एनव्हिजन’ या शुक्रावरील मोहिमेचे मूल्यांकन करीत आहे.

Contact Us

    Enquire Now