देवस्थानच्या जमिनीवर पुजाऱ्यांची मालकी नाही

देवस्थानच्या जमिनीवर पुजाऱ्यांची मालकी नाही

  • पुजारी ‘भूमिस्वामी’ नाहीत, ते संरक्षित किंवा साधे कुळ वा भाडेपट्टाधारक नाहीत. केवळ देवाची सेवा करण्याच्या मोबदल्यात देवस्थान जमिनीचे ते वहिवाटदार आहेत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • देवस्थानच्या नावावर असलेल्या जमिनीवर संबंधित देवाचेच मालक म्हणून नाव नोंदविले जाईल.
  • संबंधित पुजारी जमिनीचा वापर इनाम म्हणून किंवा वहिवाटदार म्हणून करत असला तरीही त्यांना त्या जमीनविक्रीचे अधिकार नाहीत.
  • तसेच जे पुजारी सेवा देत नाहीत, त्यांच्याकडून ही जमीन काढून घेता येईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
  • अनिष्ट प्रथांना लगाम घालण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने तेथील महसूल कायद्यान्वये परिपत्रक काढून देवस्थान इनाम जमिनीच्या महसूल नोंदीमधून पुजाऱ्यांची नावे काढून टाकणे आणि फक्त देवाचे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
  • पण या परिपत्रकास मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. नंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
  • सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती हेमंत गुप्ता व ए. एस बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
  • देवस्थानच्या जमिनी त्रयस्थ व्यक्तीला भाडेपट्ट्याने देण्याचा कोणताही अधिकार त्यांना नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला.

Contact Us

    Enquire Now