दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे : जगातील सर्वात मोठा द्रुतगती मार्ग

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे : जगातील सर्वात मोठा द्रुतगती मार्ग

  • केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी १७ सप्टेंबरला ‘दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे’ या जगातील सर्वात लांब द्रुतगती मार्गाची पाहणी पूर्ण केली.
  • एका कार्यक्रमामध्ये बोलताना १३८० किमीचा हा महामार्ग मार्च २०२३ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे गडकरी यांनी सांगितले.
  • दिल्ली ते जयपूर आणि वडोदरा ते अंकलेश्वर हा पहिला टप्पा मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
  • ९ मार्च २०१९ ला अरुण जेठली, सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती.

या महामार्गाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

  • आठ पदरी द्रुतगती मार्ग, ९८००० कोटी खर्च अपेक्षित
  • दिल्लीपासून मुंबईतील जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत)
  • केंद्रशासन नरिमन पॉइंट पर्यंत लांबी वाढवण्याचा विचार करीत आहे.
  • गुजरात (४२६ किमी), राजस्थान (३७३ किमी), मध्यप्रदेश (२४४ किमी), महाराष्ट्र (१७१ किमी), हरियाणा (१२९ किमी) आणि दिल्ली (९ किमी) या राज्यांतून हा महामार्ग जाईल.
  •  दिल्ली आणि मुंबईमधील अंतर जवळपास बारा तासांनी कमी होईल.
  • दोन आठ पदरी बोगदे, मुकुंद्रा वन्यजीव अभयारण्यामधून जाणारा ४ किलोमीटर्सचा बोगदा तसेच माथेरानमधून जाणारा ४ किलोमीटर्सचा एक बोगदा असेल.
  • हा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा असा द्रुतगती मार्ग असेल, ज्यावर प्राण्यांसाठी ओव्हरपास तयार केले जातील, जेणेकरून जंगलातील प्राण्यांना रस्ता ओलांडण्यात अडचण येणार नाही.
  • भूसंपादन मंत्रालयाने सदर प्रकल्पासाठी जवळपास १५ हजार हेक्टर जमिनीचे संपादन केले आहे.
  • हा भारतातील पहिलाच असा द्रुतगतिमार्ग असेल ज्यावर हेलिपॅड असतील तसेच दर १०० किलोमीटर्सला अपघातावर उपचारासाठी उपचारकेंद्रे असतील.
  • पर्यावरणास पूरक म्हणून दोन्ही बाजूने दोन दशलक्ष झाडे लावली जातील.
  • गुजरातमधील भरूच जवळील नर्मदा नदीवर देशातील पहिलाच आठ पदरी पूल बांधण्यात येणार आहे.
  • सदर एक्सप्रेस वे मुळे ३२० दशलक्ष लिटर इंधनाची बचत होईल तसेच कार्बन डाय अॉक्साइडचे उत्सर्जन ८५० दशलक्ष किलोग्रॅमने कमी होईल.
  • सध्या ३०१ किलोमीटर असणारा आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे हा देशातील सर्वात मोठा द्रुतगती मार्ग आहे.

भारतातील रस्ते विकास : 

  • सोळाव्या शतकात शेरशहा सूरी याने ढाका (बांग्लादेश) ते पेशावर (पाकिस्तान) दरम्यान ग्रँड ट्रंक रोड बांधला.
  • रस्ते विकासासाठीची नागपूर योजना : १९४१ ते १९६१
  • हैदराबाद योजना : १९६१ ते १९८१
  • उत्तर आणि उत्तर-पूर्व भागात रस्ते बांधण्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची स्थापना : १९६०
  • राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (नॅशनल हायवे अॉथोरिटी ऑफ इंडिया) स्थापना : १९८८
  • १९९८ मध्ये वरील प्राधिकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प सुरू करण्यात आला.
  • ग्रामीण भारतातील रस्त्यांना जोडण्यासाठी २५ डिसेंबर २००० ला प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू.
  • प्रमुख शहरांना राष्ट्रीय महामार्गांशी जोडण्यासाठी १४ जानेवारी २००४ ला प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना सुरू
  • २००५ मध्ये भारत निर्माण योजना सुरू, ज्यामधील प्रमुख क्षेत्रांमध्ये रस्त्यांचा समावेश होता. १००० लोकसंख्या असणाऱ्या खेड्यांना रस्ते पुरवण्याचे काम ही योजना करते.
  • भारतमाला मार्ग (३१ जुलै २०१५) : गुजरातपासून मिझोरामपर्यंत ५३०० किमी भूसीमेलगत मार्ग उभारण्यात येणार. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या पंधरा राज्यांमधून हा मार्ग जाईल.
  • सेतू भारतम (मार्च २०१६) : ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग रेल्वेमार्गाला छेदतात त्या ठिकाणी उड्डाणपूल बनवणे.
  • भारतमाला परियोजना (२०१७) : २०१७ ते २०२२ या कालावधीसाठी आत्तापर्यंत असणाऱ्या सर्व रस्ते विकास प्रकल्पांना एकत्र करून ही सर्वोच्च योजना सुरू करण्यात आली. २०१४ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत विकास महामंडळ मर्यादित या कंपनीद्वारे ही योजना राबवण्यात येईल.
  • देशातील सर्वात मोठा महामार्ग : राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ – ३,७४५ किमी – श्रीनगर ते कन्याकुमारी
  • देशात सर्वाधिक लांबीचे महामार्ग उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आहेत.

समृद्धी महामार्ग : 

  • हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 
  • लांबी : ७०१ किमी
  •  नागपूर- मुंबई शीघ्र संचार ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग
  • नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाईल.
  • नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास कालावधी केवळ आठ तास असेल.
  • दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर (डीएमआयसी), वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (डब्ल्यूडीएफसी), वर्धा व जालना कोरडे बंदरे आणि मुंबईच्या जेएनपीटीला जोडेल.
  • प्रत्येक बाजूला ८ लेन्स असतील.

Contact Us

    Enquire Now