तेल अवीव : जगातील सर्वात महागडे शहर

तेल अवीव : जगातील सर्वात महागडे शहर

  • अलिकडेच, इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जागतिक जीवनावश्यक खर्च अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार इस्रायलची राजधानी तेल अवीव हे राहण्‍यासाठी जगातील सर्वात महागडे शहर ठरले आहे.
  •  तेल अवीव शहराने प्रथमच या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
  •  पॅरिस आणि सिंगापूर संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर झुरिच आणि हाँगकाँग यांचा क्रमांक लागतो.  न्यूयॉर्क सहाव्या, तर जिनिव्हा सातव्या क्रमांकावर आहेत.
  •  क्रमवारी ठरवताना निकष म्हणून न्यूयॉर्क शहरातील किमतींच्या तुलनेत निर्देशांक मोजला जातो, त्यामुळे यूएस डॉलरच्या तुलनेत मजबूत चलन असलेली शहरे क्रमवारीमध्ये उच्च दिसण्याची शक्यता असते.
  •  भारतातील अहमदाबादला सर्वात स्वस्त दहा शहरांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
  •  सर्वात स्वस्त शहरांमध्ये, दमास्कस (सीरियाची राजधानी) पहिले आहे.  त्यापाठोपाठ सर्वात स्वस्त शहरांच्या क्रमवारीत त्रिपोली (लिबिया), ताश्कंद (उझबेकिस्तान), ट्युनिस (ट्युनिशिया) आणि अल्माटी (कझाकिस्तान) यांचा क्रमांक लागतो.

Contact Us

    Enquire Now