तालिबानच्या हंगामी सरकार; प्रमुखपदी मुल्ला हसन अखुंद

तालिबानच्या हंगामी सरकार; प्रमुखपदी मुल्ला हसन अखुंद

  • अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर तिथल्या काळजीवाहू सरकारची घोषणा करण्यात आली.
  • ३३ सदस्यीय काळजीवाहू सरकारच्या पंतप्रधानपदी मुल्ला हसन अखुंद यांची नेमणूक करण्यात आली आहे.
  • त्याचबरोबर मुल्ला बरादर आणि मुल्ला अब्दुस सलाम यांची उपपंतप्रधान या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

मुल्ला हसन अखुंद

  • हे सध्या रहाबारी शूरा या नेत्यांच्या परिषदेचे प्रमुख आहेत. ही परिषद तालिबानकडून घेण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल अंतिम जबाबदार असते.
  • १९९६मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानने आपले सरकार पंतप्रधान मुल्ला मोहम्मद रब्बानी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केले.
  • या सरकारमध्ये अखुंद हे १९९६ ते २००१ या काळात परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान होते.

तालिबानचा उदय

  • ‘तालिबान’ या शब्दाचा अर्थ पश्तो भाषेत ‘विद्यार्थी’ असा आहे.
  • १९९४ मध्ये दक्षिण अफगाणिस्तानच्या कंदहार शहराच्या आसपास हा गट उदयाला आला.
  • सोव्हियत सरकारची माघार आणि त्यानंतर सरकार कोसळल्यानंतर दोन वर्षांत तालिबानने देशाच्या बऱ्याचश्या भागांवर नियंत्रण मिळवत १९९६ मध्ये सत्ता स्थापन केली.
  • ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करत तालिबानचा पाडाव केला आणि तिथे लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत केली.
  • त्यानंतर तालिबान्यांनी त्यांचे अफगाणिस्तान सरकार आणि अमेरिकेविरुद्ध २० वर्षे बंडखोरी सुरू ठेवली.
  • २०२१मध्ये अमेरिकेने सैन्य माघारी बोलवताच अवघ्या आठवड्याभरात तालिबान्यांनी सत्ता स्थापन केली.

Contact Us

    Enquire Now