टंचाईग्रस्त गावांसाठी “मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना”

टंचाईग्रस्त गावांसाठी “मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना”

  • उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करणाऱ्या जनतेला पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी “स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना” राबविण्यात येणार आहे.
  • राज्यात सुमारे ४२.५ टक्के क्षेत्र (म्हणजे १७३ तालुके) हे अवर्षणप्रवण क्षेत्रात येतात.
  • राज्याची भौगोलिक रचना पाहता भूजल उपलब्धता हंगामी स्वरूपाची असल्याने अनेक गावे/वाड्या/वस्त्यांना पिण्याचे शाश्वत पाणी उपलब्ध होत नाही.
  • राज्यात पडणाऱ्या एकूण पावसाच्या ७० टक्के पाणी वाहून जाते.
  • पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये पावसाच्या पाण्याचे शास्रोक्त पद्धतीने पाण्याची साठवणूक करण्यात येणार असून टंचाईच्या काळात हे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • “कॅच द रेन” या तत्त्वावर नव्याने योजना आखण्यात आली आहे.
  • किमान ५० ते ५०० लोकसंख्या असलेल्या गावे/वाड्या/वस्त्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.
  • ही योजना अतिदुर्गम क्षेत्रातील, डोंगराळ भागातील, आदिवासी क्षेत्रातील, अवर्षणग्रस्त तसेच टँकरग्रस्त गावांकरिता असेल.
  • या योजनेच्या प्रशासकीय मंजुरीचे तथा अंमलबजावणीचे अधिकार १५ लाखांपर्यंत ग्रामपंचायतीस असेल व त्यापेक्षा जास्त खर्चाच्या योजनेच्या अंमलबजावणीचे अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
  • जिल्ह्याच्या प्रस्तावाला पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समितीद्वारे मान्यता देण्यात येईल.

Contact Us

    Enquire Now