जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत आढाव्याचे निर्देश

जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत आढाव्याचे निर्देश

  • जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६मध्ये अनेक तरतुदी आहेत. मात्र, या तरतुदींचे पालन होत नसल्याने हा कचरा धोकादायक ठरत आहे.
  • राष्ट्रीय हरित लवादाने याची दखल घेतली असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी नियमांच्या अनुपालन स्थितीचा आढावा घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.
  • अनेक राज्यांमध्ये जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन २०१६चे अनुपालन १७ ते ३८ टक्के एवढ्याच प्रमाणात होते. या नियमातील तरतुदींनुसार जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट न लावता जैववैद्यकीय सुविधांचा वापर केला जात होता.
  • जैववैद्यकीय कचऱ्याचा १०० टक्के पुनर्वापर होत नाही. मात्र जितक्या प्रमाणात या कचऱ्याचा पुनर्वापर होतो, तो अधिकृत पुनर्वापर प्रक्रियेच्या माध्यमातून व्हायला हवा. त्याचवेळी धोकादायक कचरा सामान्य कचऱ्यात मिसळायला नको, असे लवादाने म्हटले आहे.

Contact Us

    Enquire Now