जेफ बेझॉस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’चे मानवी उड्डाण यशस्वी

जेफ बेझॉस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’चे मानवी उड्डाण यशस्वी

  • ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक (प्रमुख) बेझॉस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीचे पहिले मानवी अवकाश उड्डाण २० जुलै २०२१ ला यशस्वी झाले.
  • ब्लू ओरिजिन यानाच्या अग्निबाणास न्यू शेपर्ड असे नाव देण्यात आले होते.
  • बेझॉस यांच्यासह चार जणांचा सहभाग असणाऱ्या ‘न्यू शेपर्ड’ रॉकेटने अवकाश कूपीसह जमिनीपासून शंभर किलोमीटर्सची उंची ओलांडली.
  • उड्डाणापासून दहा मिनिटांत अवकाशयात्री पुन्हा जमिनीवर सुखरूप परतले.
  • व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीच्या “युनिटी २२” नंतर ९ दिवसांत दुसऱ्यांदा अमेरिकेची अवकाश पर्यटन मोहीम यशस्वी झाली.
  • न्यू शेपर्डच्या पहिल्या मानवी उड्डाणामध्ये जेफ यांच्यासह त्यांचा भाऊ मार्क अवकाश प्रवासासाठी १९६० च्या दशकात प्रशिक्षण घेतलेल्या, मात्र प्रत्यक्षात अवकाशात जाऊ न शकलेल्या वॅली फंक या ८२ वर्षीय महिला वैज्ञानिक आणि नेदरलँडमधील १८ वर्षांचा भौतिक शास्त्राचा विद्यार्थी आणि अवकाश पर्यटक ऑलिव्हर डेमेन यांचा सहभाग
  • पश्चिम टेक्सासमधून हा अग्निबाण अपोलो ११ या चांद्र मोहिमेच्या बावन्नाव्या वर्धापनदिनी अवकाशात झेपावला.

न्यू शेपर्ड

  • १९६१ मधील अंतराळवीर एलन शेपर्ड यांच्या नावावरून रॉकेटचे नाव ‘न्यू शेपर्ड’ असे ठेवले.
  • एलन शेपर्ड हे अंतराळात पोहोचणारे अमेरिकेचे पहिले नागरिक होते.

या आधी रिचर्ड ब्रॅन्सन यशस्वी उड्डाण

  • गेल्या आठवड्यात अब्जाधीश उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन (वय ७०) यांनी ५ सहकाऱ्यांसह “व्हिव्हिएस युनिटी” या विमानातून अवकाशात उड्डाण करत अवकाश पर्यटन क्षेत्राची सैर केली.

उड्डाणातून इतिहासाचे स्मरण :

  • पहिले अमेरिकी अवकाशप्रवासी ॲलन शेपर्ड यांच्या नावावरून ब्लू ओरिजिनच्या रॉकेटचे नामकरण करण्यात आले आहे.
  • अमेरिकेसाठी २० जुलै हा दिवस महत्त्वाचा असल्यामुळे ‘न्यू शेपर्ड’च्या पहिल्या मानवी उड्डाणासाठी हीच तारीख निश्चित करण्यात आली.
  • १९७६ मध्ये याच दिवशी अमेरिकेचे ‘व्हायकिंग १’ यान प्रथमच मंगळावर सुरक्षितपणे उतरले.

Contact Us

    Enquire Now