जीएमआरटीद्वारे आकाशगंगेतील हायड्रोजनच्या वस्तुमानाचे मोजमाप करण्यात यश

जीएमआरटीद्वारे आकाशगंगेतील हायड्रोजनच्या वस्तुमानाचे मोजमाप करण्यात यश

  • नऊ अब्ज वर्षांपूर्वीच्या आकाशगंगेतील (मिल्की वे/दीर्घिका) आण्विक हायड्रोजनचे वस्तुमान मोजण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.
  • या संशोधनासाठी खोडद येथील जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा (GMRT) वापर करण्यात आला.
  • पुण्याच्या राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (NCRA) आणि बंगळूरूच्या रमण संशोधन संस्थेतील खगोलशास्त्रज्ञांच्या गटाने केलेल्या संशोधनाचा शोधनिबंध ‘द ॲस्ट्रोफिजिकल लेटर्स जर्नल’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.
  • हायड्रोजनचे वस्तुमान ताऱ्यापेक्षा साधारणपणे तिप्पट होते, तर आकाशगंगेत वायूचे वस्तुमान ताऱ्यांपेक्षा दहापट कमी असल्याचे संशोधनातून दिसून आले.
  • २०२० पर्यंत आकाशगंगेतील ताऱ्यांच्या निर्मितीचे प्रमाण कमी होण्याचे कारण अज्ञात होते. पण या संशोधनावरून तारे निर्मितीसाठीचा मुख्य घटक असलेले हायड्रोजनचे प्रमाण कमी झाल्याने ताऱ्यांची निर्मिती घटली आहे.
पार्श्वभूमी संशोधन पद्धत निष्कर्ष
सुमारे आठ दहावर्षांपूर्वी तारे निर्मितीचा वेग जास्त 21 सेंटीमीटर तरंगलांबीच्या लहरी एकत्र करून तीन हजार आकाशगंगातील हायड्रोजनचे मापन करण्यात आले. नऊ अब्ज वर्षांपूर्वी आकाशगंगा आण्विक वायूंनी समृद्ध
तारे निर्मितीचा वेग कमी कमी कारण अद्याप अस्पष्ट कमकुवत लहरींची संवेदनशीलता सुधारण्यासाठी स्टॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर आण्विक वायूंचे वस्तुमान आकाशगंगेत ताऱ्यांच्या तिप्पट होते.
आकाशगंगेतील हायड्रोजनचे वस्तुमान मोजण्यासाठी GMRT विकसित केले. जवळपास ४०० तासांच्या निरीक्षणांतून हे संशोधन करण्यात आले. आजच्या आकाशगंगेत (मंदाकिनी) आण्विक वायूंचे वस्तुमान ताऱ्यापेक्षा १० पटीने कमी आहे.
दीर्घिकेतील हायड्रोजनरूपी इंधन कमी झाल्याने तारा निर्मितीचा वेग मंद

Contact Us

    Enquire Now