जागतिक हिमोफेलिया दिन

जागतिक हिमोफेलिया दिन

  • दरवर्षी जागतिक हिमोफेलिया फेडरेशनतर्फे १७ एप्रिल हा दिवस जागतिक हिमोफेलिया दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • हा दिवस साजरा करण्याची सुरुवात १९८९ पासून झाली.
  • या दिनासाठीची २०२१ सालची थीम 'Adapting to change: sustaining care in a new world' अशी आहे.
  • हिमोफेलिया हा एक जनुकीय आजार असून हा एका पिढीपासून पुढील पिढीकडे संक्रमित होतो. हा एक रक्ताचा आजार असून या आजारामुळे मानवी शरीरातील रक्त जखम झाल्यावर न गोठता ते वाहत राहते.
  • ज्यावेळी जखम होते त्यावेळेस रक्ताची गुठळी (क्लॉटिंग) तयार होत नाही. व त्यामुळे तेथून सरत रक्तस्राव होत राहतो. म्हणजेच रक्तामध्ये थ्रोंबोप्लास्टिन (Tromboplastin) या घटकाची कमतरता असते.
  • हा एक दुर्मिळ आजार असून एकूण लोकसंख्येपैकी ०.०१% लोकांमध्ये आढळून येतो.
  • हिमोफेलियाचे तीन प्रकार आहेत. ए. बी. आणि सी. हा आजार मुख्यत: पुरुषांमध्येच आढळतो. स्त्रिया आजाराच्या वाहक असतात.
  • रक्तामध्ये एकूण १३ प्रकारचे घटक असतात. त्यालाच आपण रक्तातील प्रथिने म्हणू शकतो. जेव्हा रक्तात ८ क्रमांकाचे प्रथिन उपलब्ध नसते तेव्हा ‘ए’ प्रकारचा हिमोफेलिया असतो. ‘बी’ या प्रकारामध्ये ९ क्रमांकाचे प्रथिन उपलब्ध नसते. ‘सी’ या प्रकारामध्ये ११ वे प्रथिन उपलब्ध नसते. हा आजार शोधण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा इतिहास पहावा लागतो.
  • या आजाराबद्दल समाजामध्ये माहिती कमी प्रमाणात आहे. त्यामुळे या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

Contact Us

    Enquire Now