जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

  • दरवर्षी ३ मे हा दिवस ‘जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • या दिनाची २०२१ सालची थीम ः ‘Information as a public good’.
  • पार्श्वभूमी ः आफ्रिका खंडातील पत्रकारांनी नामिबियातील विंडोहोकमध्ये २८ एप्रिल ते ३ मे १९९१ या कालावधीत झालेल्या परिषदेत वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. माध्यमांचे स्वातंत्र्य, विविधता आणि बाह्य हस्तक्षेपापासून मुक्तता ही तत्त्वे त्याच्या केंद्रस्थानी होती. या दिवसाचे स्मरण करून संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
  • या दिनाच्या निमित्ताने माध्यमांचे स्वातंत्र्य, पत्रकारांची सुरक्षितता आदी विषयांवर जगभर चर्चा होते.
  • १९९३ मध्ये युनेस्कोने जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास मंजुरी दिली होती.

Contact Us

    Enquire Now