जागतिक जैवविविधता दिन

जागतिक जैवविविधता दिन

  • दरवर्षी जगभरात २२ मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाकडून २००१ पासून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
  • We're part of the solution ही या दिनासाठीची २०२१ सालासाठीची संकल्पना आहे.

जैवविविधता :

  • जैवविविधता म्हणजे भूस्थित, सागरी व जलीय परिसंस्था, ज्यांचा सजीव भाग आहेत, अशा सर्व परिसंस्थांमधील जीवनाची असणारी विविधता होय. यामध्ये प्रजाती अंतर्गत, प्रजाती-प्रजातींमधील आणि परिसंस्थांच्या विविधतेचा समावेश होतो.
  • पृथ्वीवरील बरीचशी जैवविविधता ही विषुववृत्ताभोवती उष्णकटिबंधीय व उप-कटिबंधीय प्रदेशांमध्ये एकवटलेली आहे. विषुववृत्तावर सर्वात जास्त विविधता आढळते आणि ध्रुवाकडे कमी होत जाते.

जैवविविधता करार (Convention on Biological Diversity – CBD)

  • संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) ने १९८८ मध्ये जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय कराराच्या आवश्यकतेविषयी एक कार्यगट नेमला. १९९२ मध्ये नैरोबी परिषदेमध्ये जैवविविधता कराराचा मसुदा स्वीकारण्यात आला.
  • ५ जून १९९२ रोजी रियो दि जानेरो या शहरात आयोजित यूएन आयोजित पर्यावरण व विकास या वसुंधरा परिषदेत हा करार हस्ताक्षरासाठी आला. जून १९९३ पर्यंत १६८ देशांनी यावर सह्या केल्या.
  • २९ डिसेंबर १९९३ रोजी हा करार अंमलात आला.

या कराराची तीन मुख्य ध्येये आहे

१. जैवविविधता संवर्धन

२. जैवविविधतेतील घटकांचा शाश्वत वापर

३. जैविक संसाधन संपत्तीच्या वापरातून होणार्‍या फायद्यांचे समान वाटप

Contact Us

    Enquire Now