जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धा, 2021

जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धा, 2021

  • 19 ते 25 जुलैला बुडापेस्ट (हंगेरी)  येथे पार पडलेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने एकूण तेरा पदकांवर आपले नाव कोरले.
  • यामध्ये पाच सुवर्ण, एक रजत तर एकूण सात कांस्य पदकांचा समावेश होता.
  • 73 किलो वजनाच्या गटामध्ये Kseniya Patapovich  हिला  हरवून  भारताच्या प्रिया  मलिक  हिने सुवर्णपदक मिळवले. जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय ठरली.
  • जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धा ही दरवर्षी होणारी 16 ते 17 वर्षे वयोगटातील कुस्ती स्पर्धा आहे.
  •  यामध्ये फ्रीस्टाइल, ग्रीको-रोमन आणि महिला कुस्ती हे तीन प्रकार  खेळले जातात. 
विजेता प्रकार पदक
प्रिया मलिक महिला 73  किलो  वजनगट सुवर्णपदक
तन्नू महिला 43  किलो  वजनगट सुवर्णपदक
कोमल पांचाल महिला 46  किलो  वजनगट सुवर्णपदक
अमन गुलिया पुरुष 48 किलो फ्रीस्टाइल सुवर्णपदक
सागर जागलान पुरुष 80  किलो फ्रीस्टाइल  सुवर्णपदक
जस्करण सिंह  पुरुष 60 किलो फ्रीस्टाइल  रजत पदक
चिराग पुरुष 51 किलो फ्रीस्टाइल  कांस्य पदक
जयदीप पुरुष 71 किलो फ्रीस्टाइल  कांस्य पदक
अंकित गुलिया  पुरुष 65 किलो ग्रीको-रोमन कांस्य पदक
अंतिम महिला 53  किलो वजनगट कांस्य पदक
वर्षा महिला 65 किलो वजनगट कांस्य पदक
  साहिल पुरुष 110 किलो फ्रीस्टाईल कांस्य पदक
सुमित  पुरुष 60 किलो ग्रीको-रोमन कांस्य पदक
  • या स्पर्धेचे आयोजन युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) या संघटनेद्वारे केले जाते.ही स्वित्झरलंडमधील संस्था आहे.

Contact Us

    Enquire Now