जागतिक आरोग्य संघटनेने युरोपला फटकारले

जागतिक आरोग्य संघटनेने युरोपला फटकारले

  • युरोपीय महासंघात तयार झालेल्या लस इतर देशांत न पाठवण्याच्या निर्णयावरून डब्ल्यूएचओने युरोपीय महासंघाला नुकत्याच दाव्होस येथे झालेल्या परिषदेत फटकारले आहे. जवळपास शंभरपेक्षा जास्त देश हे येत्या काळात लसीकरता युरोपवर अवलंबून असणार आहेत, या नव्याने वर आलेल्या ‘व्हॅक्सिन राष्ट्रवादामुळे’ कोरोना महामारी संपुष्टात आणण्यात आणखी विलंब होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

जागतिक आरोग्य संघटना

  • स्थापना – ७ एप्रिल १९४८ (जागतिक आरोग्य दिवस)
  • उद्देश – जागतिक आरोग्य संघटनाही संयुक्त राष्ट्रसंघाची विशेष संस्था आहे, जिचे मूळ उद्दिष्ट हे सर्व लोकांपर्यंत आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवणे हे आहे. 
  • सदस्य देश – १९४
  •  जागतिक आरोग्य संघटनेचे दोन मुख्य घटक आहेत जे सर्व निर्णयांकरता जबाबदार असतात.

१) जागतिक आरोग्य सभा (वर्ल्ड हेल्थ असेम्ब्ली) सर्व सदस्यदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची ही एक आमसभा आहे, यामध्ये बजेट आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते.

२) कार्यकारी मंडळ (एक्झिक्यूटिव्ह बोर्ड) सदस्य देशांमधून ३४ प्रतिनिधी हे तीन वर्षांच्या कार्यकाळावर येथे निवडून येतात. मे २०२०पासून एक वर्षाच्या कालावधीकरिता भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

  • तसेच २०१९ साली भारताच्या सौम्या स्वामिनाथन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘चीफ सायन्टिस्टम्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Contact Us

    Enquire Now