चीनमध्ये लवकरच तीन अपत्यांना परवानगी

चीनमध्ये लवकरच तीन अपत्यांना परवानगी

  • चीनमध्ये लोकसंख्येचे सरासरी वय वाढत असल्याने सर्व जोडप्यांना तीन अपत्यांना जन्म देण्यास परवानगी देण्याचा निर्णय सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.
  • चीनमधील सरकारी माध्यमांनी हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनमध्ये १९८० पासून अपत्य जन्मावर कडक निर्बंध होते.
  • या धोरणामुळे काम करणाऱ्या वयातील लोकांची संख्या झपाट्याने घसरून ६५ वर्षापुढील लोकांची संख्या वाढल्याने अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर ताण वाढू लागला आहे.
  • या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोची बैठक होऊन त्यामध्ये लोकसंख्येबाबतच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • एका जोडप्याला जास्तीत जास्त तीन अपत्ये जन्माला घालण्याची परवानगी दिल्यास लोकसंख्येच्या रचनेत सुधारणा होईल, असे मत तज्ज्ञांनी या बैठकीत व्यक्त केले.
  • २०१५ मध्ये चीन सरकारने ‘एक अपत्य’ धोरण शिथील करत दोन अपत्यांना जन्म देण्यास परवानगी दिली होती. मात्र त्यामुळे फारसा फरक पडला नाही.
  • चीनची लोकसंख्या १९८२ मध्ये १०० कोटीवर पोहोचली. नुकत्याच झालेल्या २०२० मधील सातव्या जणगणनेनुसार चीनची लोकसंख्या १४१ कोटी इतकी आहे.

Contact Us

    Enquire Now