ग्रीन हायड्रोजन

ग्रीन हायड्रोजन

  • ऊर्जा व नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्रालयाद्वारे अमेरिकन कंपन्यांना येत्या काही महिन्यांत ग्रीन हायड्रोजन व इलेक्ट्रोलायझरच्या निविदांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ग्रीन हायड्रोजन काय आहे?

  • पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जल किंवा अणुऊर्जेच्या स्रोतांपासून विजेचा वापर करून पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे ग्रीन हायड्रोजन प्राप्त होतो.
  • या प्रक्रियेत हायड्रोजन इंधनाचा वापर करून केवळ पाणी बाहेर पडते यामुळे तिला स्वच्छ ऊर्जा म्हणून संबोधले जाते.

ग्रीन हायड्रोजनची जगभरातील सद्यस्थिती :

  • ‍एकूण उत्पादित हायड्रोजनच्या एक टक्क्यापेक्षा कमी प्रमाणात ग्रीन (हरित) हायड्रोजन आढळतो.
  • इलेक्ट्रोलायझर्सचे उत्पादन आणि उपयोजन २०५० पर्यंत वाढत्या दराने ०.३ गिगावॅटच्या क्षमतेपासून जवळजवळ ५००० गिगावॅटपर्यंत वाढवावे लागेल.

भारतातील सद्यस्थिती :

  • भारतात दरवर्षी औद्योगिक क्षेत्रात अमोनिया आणि मिथेनॉलच्या उत्पादनासाठी सुमारे सहा दशलक्ष टन हायड्रोजन वापरला जातो.
  • भारतातील ग्रीन हायड्रोजनचा उत्पादित खर्च सध्या महाग असून प्रतिकिलो ३ ते ६.५ अमेरिकन डॉलर्स इतका आहे.
  • आगामी काळात हा उत्पादित खर्च २ डॉलर्सपर्यंत मर्यादित करण्याचा प्रयत्न चालू आहे, ज्यामुळे भारत ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीत ‘ग्लोबल हब’ बनू शकेल, त्यासंबंधीचे महत्त्वाचे पाऊल म्हणजे केंद्र सरकारचे ‘हायड्रोजन मिशन’.

ग्रीन हायड्रोजनचे महत्त्व :

  • पॅरिस करारानुसार, जगासमोर २०५० पर्यंत कार्बनशून्य प्रगतीचे लक्ष्य गाठण्यासाठी राष्ट्रीय निर्धारित योगदान लक्ष्ये (INDC) ठरविण्यात आली आहेत.
  • भारताला आयएनडीसी अंतर्गत लक्ष्यांच्या पूर्ततेसाठी व प्रादेशिक आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा आणि उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन ऊर्जा अत्यावश्यक आहे.
  • तसेच इलेक्ट्रोलायझर उत्पादनाचे स्थानिकीकरण आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाच्या विकासामुळे भारतात १८ ते २० अब्ज डॉलर्सची नवी ग्रीन टेक्नॉलॉजी बाजारपेठ निर्माण होऊन हजारो रोजगार निर्माण होऊ शकतात.

उपयोग :

  • ग्रीन हायड्रोजनचा वापर फिडस्टॉक, इंधन किंवा ऊर्जावाहक तसेच साठवण म्हणून केला जातो.
  • खते, वीज, शिपिंग तसेच अमोनिया व मिथेनॉल सारख्या रसायनांच्या निर्मितीसाठी हायड्रोजनचा वापर केला जातो.
  • सीटी गॅस नेटवर्कच्या (सीजीएन) व्यापक स्वीकृतीसाठी त्यात १० टक्के ग्रीन हायड्रोजन मिश्रणाचा वापर करता येऊ शकतो.

नवीकरणीय ऊर्जेसंबंधित भारताची महत्त्वाची पावले :

अ) राष्ट्रीय सौर आघाडी (२०१५)

ब) जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशन (२०१०)

क) पीएम – कुसुम योजना (२०१९)

ड) राष्ट्रीय हायड्रोजन मिशन (२०२१)

Contact Us

    Enquire Now